Subscribe Us

गुणवत्ता व एकाग्रता वाढवण्यासाठी आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम...

 



[                   गुणवत्ता व एकाग्रता वाढवण्यासाठी आदर्श जि प 
शाळा बोराखेडी येथे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम...

 मोताळा लगत असलेली आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे सतत
 विद्यार्थ्यांची उपस्थिती व गुणवत्ता वाढविण्यासाठी वेगवेगळ्या
 नाविन्यपूर्ण कल्पना व उपक्रम मुख्याध्यापक अनिल चव्हाण 
राबवित असतात. कोविड काळातील शिक्षण आंँनलाईन शिक्षण
असो कि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन शिक्षण देण्यासाठी बोराखेडी 
येथील मुख्याध्यापक व शिक्षक नेहमी तत्पर असतात.आज दोन
दोन विद्यार्थ्यांना मधे पोटाच्या मधोमध फुग्याला बँलेंस करत
फुग्याला हात न लावता , फुगा पडू न देता थोड्या अंतरावर चालत
जाऊन जी जोडी लवकर पोहचेल त्या जोडीला प्रथम क्रमांक दिला
जातो व वही पेन बक्षीस देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे एकाग्रता
वाढवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.तसेच"मोकळीका" 
नावाचा उपक्रम फळे ,फुले, नद्या, जिल्हे, खनिजे,अवयव,असे 
विविध विषयांवर शब्द चिट्टी तयार करून पाच पाच विद्यार्थ्यांचा 
गट तयार करून पाच गट तयार करून त्यात सर्वांसमोर बंद 
चिट्ट्या टाकून त्या विद्यार्थ्यांना जमा करावी व शब्दांनुसार गट 
तयार करने जो गट प्रथम तयार करेल त्याला प्रथम क्रमांक देऊन 
कोरोना काळात विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक आवडते असे खेळ
घेऊन मोकळ्या वातावरणात पुस्तका विना हसत खेळत
विद्यार्थ्यांच्या मनमोकळेपणाने मुक्तपणे वेगवेगळे नाविन्यपूर्ण
उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी
व उपस्थिती गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न आदर्श जि प शाळा 
बोराखेडी येथे नियमितपणे सुरू आहे. सदर उपक्रमात सिमा गोरे
व सुनिता हुडेकर मंडम व मुख्याध्यापक अनिल चव्हाण सह 
विद्यार्थी सहभागी होते.

Post a Comment

0 Comments