*शाळा बंद शिक्षण सुरू.... दृढ इच्छाशक्ती असेल व उत्कृष्ट कार्य करण्यासाठी आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम अशक्य नाही.....कोरोना महामारी मुळे सध्या शाळा बंद असुन विद्यार्थी घरी आहे .शिक्षणाविषयी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही साहित्य नाही ...पालकांची शेतीच्या कामासाठी लगबग आहे . खेड्यातील शेतकरी पालकांना विद्यार्थ्यांकडे लक्ष द्यायला वेळ कुणाकडे आहे. ते आपले वर्षभराच धान्य दाळदाणा कसा पिकेल यातच मग्न आहेत. विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आली आहे यातच पालकांचा आनंद पण मग मुले कशी शिकणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.लाँकडानमुळे सध्या सगळीकडे आँनलाईन अभ्याक्रम सुरू आहे.. परंतू ग्रामिण भागातील किती विद्यार्थ्यांजवळ अँन्ड्राँईड मोबाईल आहे तर हे शिक्षण कस शक्य होणार. .... विद्यार्थ्यांजवळ अँन्ड्राँईड मोबाईल नसल्याने आँनलाईन अभ्याक्रम पुर्ण होत नाही, शासनाने टि वी दुरदर्शन वर टिलीमीली कार्यक्रम सुरू केला परंतु अनेकांकडे टि व्ही नाही त्यात काही थोडीफार सुविधा असली तर मग रेंज प्राँबलेम ,विद्युत नसते ,पालक मोबाईल घेऊ शकत नाही त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणारच ना...मग आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी एक युक्ती आपल्या शाळेतील शिक्षकांना सांगितली, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रहावात ठेवण्यासाठी शाळास्तरावर अभ्यास करण्यासाठी चार ते पाच पानाची स्वयंम अध्ययन सहज सोडवतील अशी अभ्यास चाचणी पेपरवर तयार केली व झेरॉक्स करून प्रत्येक विद्यार्थ्याला घरी जाऊन वाटप करण्यात आली.. हा उपक्रम दर आठवड्यासाठी राहणार असुन दर आठवड्याला विद्यार्थ्यांना अभ्यास वाटप होणार व होत आहे पालक जरी शेतात पण विद्यार्थी आता शिक्षकांची वाट बघत असतात...अक्षर अंक ओळखा, लहान मोठी संख्या ,शब्दांच्या जोड्या लावा,गाळलेले अंक भरा,बेरीज, वजाबाकी, चित्र ओळखुन नाव लिहा, चित्र रंगवणे,उतारा वाचुन प्रश्नाची उत्तरे लिहा,मागची पुढची संख्या लिहा , शब्द तयार करा,वाक्य तयार करा असे वर्गानुसार अभ्यास विद्यार्थ्यांना झेरॉक्स करून घरपोच दिल्याने पालकांना खुप दिलासा मिळाला.अनेक पालकांनी शाळेत येऊन अभ्यास मुलांचा अभ्यास नेला व या उपक्रमाचे पालकांनी कौतूक केले. कारण खेड्यात आँनलाईन शिक्षणाची सुविधा पुर्ण नसल्याने विद्यार्थ्यांना घरपोज अभ्यास हा उपक्रम खुप प्रभावी ठरला. काही मुलांना शक्य होईल तेथे मुलांना सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून शिकवल्या सुद्धा जात आहे .तसेच स्मार्ट फोन असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आँनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षक काम करत आहे. परंतू कोरोणा काळातही आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी मुख्याध्यापक शिक्षक एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी मास्क सँनिटायझर चा वापर करत घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व अभ्यास देतात हा आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी चा विशेष प्रयत्न आहे..... अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आंतरराष्ट्रीय जि प शाळा बोराखेडी मोताळा 7796228888, | ![]() ![]() |
- Home
- पहिली
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- दुसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- तिसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास
- चौथी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास-१
- _प.अभ्यास-२
- पाचवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _प,अभ्यास-१
- _प,अभ्यास-२
- _मराठी
- सहावी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- सातवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भुगोल
- आठवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- उपक्रम
- YOUTUBE
- शैक्षणिक
- आजच अभ्यास
- आकारिक चाचणी
- संकलित मूल्यमापन चाचणी
- शासन निर्णय
- संकलित पेपर सत्र १
0 Comments