Subscribe Us

भाषिक कोडे ओळखा पाहू मी कोण ? मनोरंनात्मक खेळ





भाषिक कोडे ओळखा पाहू मी कोण ?


(१ )गोड तुरट चव माझी आयुर्वेदिक राजा मी. 

लहान मोठ्यांना आवडे मी शरीरासाठी बहुगुणी

ओळखा पाहु मी कोण?

उत्तर -- आवळा

====================

(२ ) समुद्रकिनारी राहतो,उंच उंच वाढतो,

शुभकार्यात माझ्या फळाला फारच मान मिळतो.

ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- नारळाचे झाड

-----------------------------------

(३ )झाडावर राहतो, वसंतात गातो,

काळा जरी मी आनंद पसरवतो.

ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- कोकीळ

-----------------------------------

(४) डोंगरावरून येते, सदैव धावते,

शेते आणि माणसांना उपयोगी पडते.

ओळखा पाहू मी कोण ?

उत्तर -- नदी

--------------------------------------

(५) माझ्या पानांचे तोरण करतात,

    फुलांना 'मोहोर' म्हणतात,

  सुमधुर फळांची सर्वच वाहव्वा करतात.

  ओळखा पाहू मी कोण ? 

उत्तर -- आंब्याचे झाड'

====================

 माझ्या www.myidealeducation.com या ब्लाॅगवर ' 

सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक

उपक्रम वाचवण्यासाठी  ब्लाॅगवरून माहिती मिळवा.

 

Post a Comment

0 Comments