राज्य कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता DA फरकासह लागु करणेबाबत वित्त विभागाकडुन शिक्कामोर्तब .
राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा , निवृत्तीवेतनधारक त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना 34 टक्के महागाई भत्ता डी.ए फरकासह लागु करणेबाबतच्या प्रस्तावाला वित्त विभागाकडुन शिक्कामोर्तब करण्यात आले आहे .यामुळे राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांची डी.ए वाढची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे .
नुकतेच केंद्रीय कामगार व रोजगार मंत्रालयाकडुन ग्राहक किंमत निर्देशांक जाहीर करण्यात आलेले आहेत .सदर निर्देशांकाच्या आधारे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 38 टक्के दराने लागू करणेबाबतच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिल्याने , राज्य सरकार देखिल जानेवारी 2022 पासुन केंद्र सरकारप्रमाणे 34 टक्के महागाई भत्ता डी.ए फरकासह लागु करण्याच्या प्रस्तावावर राज्य शासनाकडुन शिक्कामार्तब करण्यात आला आहे .याबाबतचा अधिकृत्त शासन निर्णय लवकरच राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन निर्गमित केला जाईल .
सदर महागाई भत्ता हा जानेवारी 2022 पासुन लागु करण्यात येणार असल्याने , जानेवारी ते जून या कालावधीमधील डी.ए फरक जुलै महिन्याच्या वेतनासोबत रोखीने अदा करण्यात येईल .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसापासुनची डी.ए वाढीची प्रतीक्षा संपली आहे .
संच मान्यता मार्गदर्शन 👉डाउनलोड करा
आदर्श शिक्षक वेतन वाढ👉 डाउनलोड करा
सादिल अनुदान मंजूर निर्णय 👉डाउनलोड करा
1 Comments
Thank Sir For Valuble Information
ReplyDelete