Subscribe Us

जि प बोराखेडी शाळेतील कु काजलला मिळणार 48000 शिष्यवृत्ती...



जि प बोराखेडी शाळेतील कु काजलला मिळणार 48000 शिष्यवृत्ती...
मोताळा तालुक्यातील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम व गुणवत्तेसाठी सातत्याने झटणारी आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील विद्यार्थ्यांनी काजल चंदुलाल पुरभे हि विद्यार्थी एन एम एम एस परिक्षेत जनरल संवर्गात गुणवत्ता यादीत निवड झाली आहे. काजल पुरभे या विद्यार्थ्यांनीला सदर एन एम एम एस परिक्षेत यश मिळाल्यामुळे 48000 रू शिष्यवृत्ती मिळणार आहे.  
                  आर्थिक दुर्बल घटकातील ग्रामीण विद्यार्थ्यांना केंद्र सरकारने माध्यमिक शिक्षण यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर शिष्यवृत्ती सुरु केली आहे.
                          मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे शाळेचा भौतिक विकास साधत शैक्षणिक गुणवत्ता विकास साधण्यासाठी शाळेचे शिक्षक सदैव अग्रेसर असतात त्यामुळे विद्यार्थी पटसंख्या 430 एवढी वाढली आहे. 
                            विद्यार्थी गुणवत्ता विकास साधण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धसाठी शैक्षणिक उपक्रमाचे नियोजन केले आहे त्यानुसार शिष्यवृत्ती परीक्षा ,स्पर्धा परीक्षा ,नवोदय यांची यांसारख्या परिक्षेची तयर आँगष्ट महीन्यापासुनच केली आहे. त्यामुळे नवोदय एन एम एस वापरुन व शिष्यवृत्ती परीक्षेमधे जि प शाळा बोराखेडी यशस्वी होत आहे व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्याय मुख्याध्यापक व सर्व शिक्षक प्रामाणिक कार्य करत आहेत. 
                           कु. काजल पुरभे यांचा मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शाळेत सर्व विद्यर्थ्यांच्या समोर सत्कार करण्यात आला. तशेच यांच्या यशामध्ये त्यांच्या वर्ग शिक्षिका जया चव्हाण यांनी व इंगळे मंँडम यांनी खुप मेहनत घेतली त्यांचा सुध्दा आज सत्कार करण्यात आला.

💥आदर्श परिपाठ नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💥आकारिक चाचणी वर्ग १ ते ४  पाहण्यासाठी येथे  क्लिक करा

💥आकारिक चाचणी वर्ग १ ते ४  पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💥शिक्षक बदली बाबत अपडट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢 शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा



Post a Comment

0 Comments