Subscribe Us

कोरोना काळात शिक्षकांची भुमीका महाभारतातील श्रीकृष्णासारखी असावी.‌..


Anil Chavhan H.M. 

Attachments4:16 PM (1 hour ago)

कोरोना काळात शिक्षकांची भुमीका महाभारतातील श्रीकृष्णासारखी असावी.‌.....

                           शालेय विद्यार्थी शिक्षणापासून सतत वंचित राहण्याचे हे दुसरे वर्ष आहे....
 पुर्वी सतत गैरहजर म्हणजे दोन चार आठवडे शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत नापास
 करता येत होते. नापास करण्याचे कारण असे होते , सतत गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांची
शैक्षणिक संपादणूक पातळी पुर्ण झाली नाही , शैक्षणिक प्रगती झाली नाही म्हणून त्या विद्यार्थ्यांना 
त्याचं वर्गात ठेवण्यात येत होते, जेणेकरून त्याची शैक्षणिक संपादणूक पातळी पुर्ण होईल.. 
परंतु 2009 राईट आँफ एज्युकेशन ( RTE ACT) कायद्याच्या अंतर्गत आता 1 ली ते 8 वी
 पर्यंत विद्यार्थी नापास करता येत नाही..त्याची शैक्षणिक प्रगती ही विविध शैक्षणिक तंत्राच्या व
 उपक्रमांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक नोंदीच्या माध्यमातून पुर्ण करून त्याची शैक्षणिक 
संपादणूक पातळी पुर्ण करून त्याचे पुढील वर्गात पदोन्नत करतात.... सध्या अनेक पालक हे
 मुख्याध्यापक व शिक्षक यांना सांगत आहेत की माझ्या मुलाला त्याच वर्गात बसवा कारण एक
वर्षे झाले त्याचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नाही. सन 2020-21 मधे शासन निर्णयानुसार RTE ACT
 2009 नुसार विद्यार्थी पुढील वर्गात वर्गोन्नत करण्यात आले... आता सध्या परिस्थिती नुसार हा
 निर्णय योग्य आहे यात काही शंका नाही.परंतू शिक्षक म्हणून विचार केला तर हे योग्य आहे का हि 
एक चिंतनाचा विषय आहे... अभ्यासक्रम पूर्ण न करता, मागिल वर्गातील किमान अध्ययन क्षमता
 शैक्षणिक संपादणूक पातळी पुर्ण न करता तो विद्यार्थी पुढील वर्गात वर्गोन्नत होतो याचे खरे दुःख
 फक्त शिक्षकच समजू शकतो . कोरोना काळात शाळा बंद आहे पण शिक्षण सुरू आहे, परंतू
 आंँनलाईन सुविधा उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचत नाही....
                     महाभारतात जेंव्हा पांडवावर संकट आले ते सुख संपत्ती असुनही धर्माचे पालन 
करण्यासाठी राजवैभव सुखसंपन्न जीवन सोडून जंगलात गेले. कठीण परिस्थितीत त्यांनी आपले
 जीवन व्यतीत केले. पांडवांवर अन्याय झाला हे सर्वांना माहीत होते परंतू त्यांना कुणी मदत करत
 नव्हते.कारण राजा , प्रजा व सत्ता कौरवांची होती. कौरवांची बाजू मजबूत होती त्या परिस्थितीत
 कौरवांना शह देण्यासाठी कुणी समोर येत नव्हते... परंतू पांडवांना न्याय देण्यासाठी महाभारतातील 
युध्दात ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला सारथी बनून आपले कौशल्य पणाला लावून पांडवांना आपले 
साम्राज्य मिळवून दिले तशीच परिस्थिती आज शिक्षकांची निर्माण झाली आहे...
                     आज कोरोना संकटात शालेय विद्यार्थी हा संकटात सापडला आहे, तो शिक्षणापासून 
वंचित राहत आहे. विद्यार्थी हा शब्द समजतो तेवढा साधारण नाही तो असाधारण आहे विद्यार्थी म्हणजे
या देशाचे उज्ज्वल भविष्य आहे. हे भविष्य जर अंधारात राहीले तर या देशात भविष्यात अराजकता 
निर्माण होईल. अजूनही वेळ गेलेली नाही विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल करण्याची ताकद शिक्षकात आहे
 शिक्षकांना महाभारतातील श्रीकृष्ण बनावे लागेल. ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाचा सारथी बनून बलाढ्य
 कौरवांच्या विरूद्ध युद्ध जिंकले त्याप्रमाणे शिक्षकाने विद्यार्थ्यांचे सारथी बनून कोरोना काळातही विद्यार्थ्यांना
 ज्ञानदानाचे सत्कार्य करावे लागणार आहे , विद्यार्थ्यांला अर्जुन समजून कठीण परिस्थितीत शिक्षकाला 
श्रीकृष्णाची भुमिका पार पाडावी लागणार आहे. कठीण परिस्थितीत जो चांगले कार्य करतो त्याचाच समाज
 भविष्यात सन्मान करतो व त्याचेच गुणगान करतो...आज जरी परिस्थिती बिकट आहे परंतू शिक्षकाने 
ठरवले तर घरोघरी जाऊन वस्तीमध्ये, मंदिरात, 5 ते 10 मुलांना एकत्र गट करून ज्ञानार्जन करणे ही
 काळाची गरज झाली आहे.सध्या ग्रामीण भागात सर्व पालक शेतकरी आहे शक्यतोवर पालक शेतातील
 कामाकरीता धावपळ करत आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांना आंँनलाईन अभ्यासाचे धडे मिळत आहे 
परंतु मुलांची अवस्था खुप वाईट झाली ज्याप्रमाणे गाय आपले वासरू घरी सोडून वनात चरायला जाते व
 संध्याकाळी येऊन कसेबसे दुध पाजते तशी अवस्था विद्यार्थ्यांंची झाली आहे. पालक घरी आल्याशिवाय 
आंँनलाईन शिक्षणाचे धडे मुलांना मिळत नाही. त्यातही 100% पालकांजवळ अँड्रॉइड मोबाइल नाही
.त्यामुळे आंँनलाईन शिक्षण हे 100% प्रभावी होत नाही. अशा परिस्थितीत शिक्षकांनी आपली नैतिक
 जबाबदारी स्वीकारून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शक्य होईल तसे घरोघरी जाऊन गटागटाने
 विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी अभ्यासाचे धडे गिरवने आवश्यक झाले आहे. तसे तर
 धेय्याने वेडे असलेले शिक्षक आजच्या कठिण परिस्थितीतही विद्यार्थ्यांना अभ्यासाचे धडे देण्यासाठी 
घरोघरी, मंदिरात जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे सत्कार्य करत आहे. परंतू हे ज्ञानदानाचे कार्य सिमीत
न राहता आता सर्व शिक्षकांनी मिळून विद्यार्थ्यांच्या हितासाठी शैक्षणिक चळवळ निर्माण केली पाहिजे
                    प्लेगची साथ असतांना महीलांचा अभिमान असणाऱ्या पहील्या मुख्याध्यापिका ज्ञानज्योती 
सावित्रीबाई फुले यांनी मुलिंच्या शिक्षणासाठी अहोरात्र ज्ञानदानाचे सत्कार्य केले. शाहु महाराज ,महात्मा फुले,
 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आदर्श बाळगणारे आपण शिक्षक आज या थोर पुरुषांनी गरिबी 
वंचित दिन दुबळ्या घटकांतील जनतेसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना जगण्याचे सामर्थ्य निर्माण केले.
 हे विसरता कामा नये या थोर पुरुषांच्या सत्कार्यावर शिक्षकांनी चिंतन मनन करून आजच्या परिस्थितीत 
आपण आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नेमके कोणते प्रयत्न केले पाहिजे याचा 
सकारात्मक विचार करने अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याचे एकमेव केंद्र म्हणजे
 शाळा आहे व तेथे मार्गदर्शन करणारा महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. आज शाळा बंद असल्यामुळे
 विद्यार्थी गावात भटकत आहेत त्यांच्या वर्तनात नकारात्म बदल दिसत आहे .  10 ते 14 वयोगटातील 
विद्यार्थ्यांवर तर खरोखर बालमजुरी करण्याचा एक प्रकारे अन्याय होत आहे. 10ते 14 वयोगटातील
 मुले मुली शेतात काम करत आहे. त्यांचं वय हे मुजरी करण्याचे नसून चांगल्या गाणी गोष्टी ऐकत 
खेळण्याचं बागडण्याच शिक्षणाचं आहे परंतू शाळा बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांवर बालमजुरीचे संकट
निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांवर शाळेतील शैक्षणिक विचारचे , ज्ञानाचे, शिस्तीचे संस्कार होत नसल्याने
 विद्यार्थी दिशाहीन होत आहे व बालमजुरीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य खालावत आहे हि सुद्धा एक नवीन 
समस्या निर्माण झाली आहे
                 खर तर आज विद्यार्थी प्रती शिक्षकांची भुमिका सादर करण्याची हिच योग्य वेळ आहे 
जनमानसात शिक्षकांचे स्थान व सन्मान टिकवण्यासाठी वाढवण्यासाठी कोरोना काळातही विद्यार्थ्यांना
 ज्ञानदानाचे धडे देण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी पुढे यायला हवे . आंँनलाईन शिक्षण असो कि घरोघरी 
जाऊन गटागटाने आँफलाईन शिक्षण असो ग्रामीण भागातील विद्यार्थी गरिब वंचित घटकातील विद्यार्थी
 शिक्षणापासून वंचित रहायला नको याची काळजी घेणे गरजेचे आहे, नाहीतर यांचे दुष्परिणाम भविष्यात 
समाजातील प्रत्येक नागरिकाला भोगावे लागेल एवढे मात्र निश्चित आहे...

  अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक
       आदर्श जि प शाळा बोराखेडी

Attachments area

Post a Comment

0 Comments