Subscribe Us

आता शाळा सुरू झाल्या पाहिजे..........



 आता शाळा सुरू झाल्या पाहिजे..........

                    दिड वर्ष झाले शाळा बंद आहे कधी लाँक डाऊन कधी अनलाँक...यामधे सर्व प्रकारच्या सोई सुविधा बंद व  सुरू झाल्या. परंतू शाळा मात्र बंदच आहे सगळं काही अनलाँक झालं मात्र शाळा का लाँक आहे याच कोड कधी सुटणार?.... शाळा कधी सुरू होणार हा खुप चिंतेचा व चिंतनाचा विषय झाला आहे. जेव्हा पालक संपर्क किंवा घरोघरी स्वाध्याय साठी गावात जातो तेंव्हा एकच प्रश्न विद्यार्थी व पालकांचा असतो "सर शाळा कधी सुरू होणार" हा प्रश्न ऐकला की काय बोलावं हेच कळत नाही शिक्षक असुनही अशिक्षित सारखं निरूत्तर व्हावे लागते असमाधानकारक शाळा सुरू होणार आहे असं उत्तर सांगावे लागते... भारतातील जागतिक अशा अनेक मानसशास्त्रज्ञ , डॉ, शास्त्रज्ञ, तज्ञ व्यक्तीची मुलाखत ऐकली मत ऐकले की लहान मुलांना कोरोना संसर्ग होत नाही......मग शाळा का बंद आहे याचं कोडं अजुन सुटता सुटत नाही....लग्न समारंभ सुरू, तिथे गर्दीत मुल येतात.. दुकान सुरू तिथे मुलं गटागटाने आढळतात... भाजीबाजार सुरू तिथे मुलं आई-वडीलांसोबत आढळतात...गावात छोटे मोठे कार्यक्रम भंडारे सुरू आहे तिथे मुलं आढळतात...गावात ५/१० मुले एकत्र खेळतात... पर्यटनस्थळ सुरू आहे तिथे परिवारासोबत मुलं आढळतात...नेते मंडळी यांचे मोर्चे, कार्यक्रम, सभा आशिर्वाद यात्रा सुरू आहे, या कार्यक्रमात सहभागी होणारे पुरूष मंडळी हे कोणातरी मुलांचे पालक आहेच मग या सर्व ठिकाणी कोरोना संसर्ग होत नाही?..... आणि स्वच्छ सुंदर वातावरण असलेल्या शाळेत विद्यार्थ्यांना कोरोना होतो का?  हा प्रश्न चिंतनाचा आहे...
               विद्यार्थी हा या देशाच उज्वल भविष्य आज देशाच भविष्य अंधारात आहे अडचणीत आहे याकडे कुणी लक्ष देईल का?.. शेतकरी आंदोलनासाठी दिल्लीत आंदोलन सुरू आहे, पण या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुणी आवाज उठवेल का?... राज्यात अनेक प्रकारचे संशोधन सुरू आहे  देशात खुप विद्वान, शिक्षण तज्ञ, शैक्षणिक शास्त्रज्ञ आहे कुणीही शाळा सुरू झाल्या पाहिजे या विषयावर चर्चा करत नाही किंवा मत मांडले जात नाही. शिक्षणाविषयी  "डोळे असुन आंधळे",  "वाचा असुन मुके,"  "ऐकु येत असुन बहीरे" अशी यांची अवस्था सर्वांची झाली आहे.  शिक्षण हा खुप चिंतनाचा विषय आहे.  दिड वर्षांपासून प्राथमिक शाळेत जाणारा विद्यार्थी घरी आहे, बालमानशास्राचा विचार केला तर विद्यार्थ्यांना मनावर लहान वयातच शैक्षणिक संस्कार केले तरच विद्यार्थ्यांची मानसिक शारीरिक बौद्धिक क्षमता चांगली राहु शकते. आणि जर योग्य वेळी जर विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्कार मिळाले नाही तर त्याचे मानसिक संतुलन बिघडू शकते याचे उदाहरण आपल्याला आजही गावोगावी दिसत आहे.. 
              दिड वर्षांपासून विद्यार्थी शाळेतच गेला नाही तर  विद्यार्थ्यांच्या आचारात व विचारात अमुलाग्र बदल घडवून येतो हे आजही आपण खेड्यात गेलो तर आपल्याला दिसेल... विद्यार्थ्यांना चांगले राहने, चांगले बोलने, तसेच वाचन, लेखन, श्रवण,भाषण या कौशल्याचा गंधच राहीला नाही. याउलट विद्यार्थी आँनलाईन शिक्षणाच्या या प्रवाहात भरकटत चालला आहे. आंँनलाईन शिक्षणामुळे मोबाईलच्या सवयीमुळे विद्यार्थी एकलकोंडी झाली आहे.मोबाईलमधील गेम खेळून किंवा यु ट्युब व्हिडिओ बघायच्या सवयी लावून विद्यार्थी हा वेगळ्या मानसिकतेत ढासाळत चालला आहे. सतत मोबाईल वर गेम खेळण्याच्या प्रवृत्तीमुळे विद्यार्थी चिडचिड करणे, एकांत राहणे, डोळ्यांवर व मनावर वाईट परिणाम होतांना अनेक उदाहरणे गावात आढळून येत आहे. मोबाईल मुळे विद्यार्थी एकाच ठिकाणी थांबला आहे, त्याचा शारिरीक सर्वांगीण विकास थांबला आहे. शाळेत होणारे विविध शैक्षणिक उपक्रम, खेळ गाणी गोष्टी आता विद्यार्थ्यांना मिळत नसल्याने विद्यार्थ्यांंचा सर्वांगीण विकास खुंटला आहे‌ ‌‌.शालेय वातावरणात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला सतत वाव मिळत असतो. सतत विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातुन, कृतीतून विद्यार्थी नविन शिकत असतो व नवनवीन प्रयोग करीत असतो. आज शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला अजिबात वाव मिळत नाही. विद्यार्थ्यांची सर्जनशीलता नष्ट होत चालली आहे.
                शिक्षक व शाळा सुद्धा आता विद्यार्थ्यांची सतत वाट बघत आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हा फक्त शाळेत साधल्या जातो. शाळा म्हणजे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक ,शारीरिक, मानसिक विकासाचे उत्कृष्ट मंदिर आहे . विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले रहावे, देशात  सुजाण आदर्श नागरिक घडावे, देशाच भविष्य सुरक्षित रहावे असे जर वाटत असेल तर "आता शाळा सुरू झाल्याच पाहिजे"... असा सुर सर्वानुमते येत आहे....  

अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आदर्श जि प शाळा बोराखेडी 9767866933
                 

                  




Post a Comment

0 Comments