शाळेच्या विकासाचा ध्यास घेऊन परिवर्तनाच्या वाटेवर चालणाऱ्या माझ्या सर्व मुख्याध्यापक बांधवांना नमस्कार मनःपुर्वक अभिनंदन व शुभेच्छा. निष्पाप निरागस विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे व त्यांना लाभदायक शैक्षणिक वातावरण मिळावे हे कार्य आपण हाती घेतले आहेत हे निश्चित पवित्र कार्य आहे. शाळा ISO करण्याचा मनात आलेला सकारात्मक वैचारिक दृष्टिकोन म्हणजे यशाची पहीली पायरी आहे. शाळेचा विकास हा तेथील शिक्षक समुहाच्या सकारात्मक विचारांवर अवलंबून असतो. स्वतः शाळेसाठी जेंव्हा आपण योगदान देतो तेंव्हा इतरांकडून आपल्याला तसाच सहकार्याच्या दृष्टीने खुप चांगला प्रतिसाद मिळत असतो.
"शाळेच्या विकासातील महत्त्वाची गोष्ट".... शाळेसाठी ईतर दानशूर व्यक्तींकडून जेव्हा आपण सहकार्य मागाल तेंव्हा मदत ही पैशाच्या स्वरूपात कधीच मागू नका, शाळेसाठी योगदान हे नेहमी शाळा व विद्यार्थ्यांना लागणारे आवश्यक साहित्य स्वरूपातच मागीतले पाहिजे म्हणजे लोकांचा विश्वास कायम असतो. आणि दानशूर व्यक्तीचा सन्मान करणे आवश्यक आहे. पुनश्च एकदा शाळा व विद्यार्थी विकासासाठी झटणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षक यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.....
ISO शाळेसाठी दानशूर व्यक्ती कडून आवश्यक लोकवर्गणी साहित्य किंवा वस्तुची यादी.....
१) आर ओ
२) वर्गात व्हाँईट बोर्ड
३) टाय बेल्ट
४) शुज साँक्स
५) कचरा कुंडी
६) साऊंड सिस्टीम
७) वृक्ष कुंडी
८) चटई
९) कम्प्युटर
१०) एल ई डी
११) वही पेन
१२) स्कुल बँग
१३) ग्रंथालयातील पुस्तके
१४) थंड पाण्याचे फ्रिजर
१५) टेबल खुर्ची
१६) टँब
१७) ग्रंथालय कपाट
१८) खेळ साहीत्य
१९) लोअर टि शर्ट
२०) लेझीम ढोल
२१) पालक संपर्क इत्यादी...
अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत
मुख्यध्यापक आदर्श जि प शाळा बोराखेडी
1 Comments
Sir, yourwork is really great!👍👍💐💐
ReplyDelete