Subscribe Us

आदर्श शाळा बोराखेडी येथील धान्य निवडीतून संख्या ज्ञान व एकाग्रता वाढवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम....

 


आदर्श शाळा बोराखेडी येथील धान्य निवडीतून संख्या ज्ञान व एकाग्रता वाढवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम....


आदर्श शाळा बोराखेडी येथील धान्य निवडीतून संख्या ज्ञान व एकाग्रता वाढवण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम....

               शाळा बंद असल्यामुळे वर्ग 1 ला २ रा या वर्गातील विद्यार्थ्यांना सध्या शिक्षणाचा विसर पडला आहे. या लहान चिमुकल्या बालकांना शिक्षणाची गोडी निर्माण करण्यासाठी व शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आनंददायी शिक्षण बोराखेडी शाळेत दिल्या जाते. सध्या विद्यार्थ्यांना शाळा हि नविनच वाटायला लागली आहे.त्यात प्रथमच शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुरवातीला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या आवडीच्या प्रक्रियेतुन शिक्षण देण्यासाठी मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहे. 

                 "एकच ध्यास गुणवत्ता विकास" या उक्तीप्रमाणे बोरोखेडी येथे गरिबी वंचित शेतकरी कुटुंबातील मोबाईल ची सुविधा नसलेल्या विद्यार्थ्यांचा गुणवत्ता विकास साधण्यासाठी लहान मुलांना शाळेची गोडी लावण्यासाठी विद्यार्थ्यांना पाटीवर चवळी व हरभरा असे धान्य एकत्र करून ते वेगवेगळे करण्यासाठी सांगितले जाते विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढून लक्ष केंद्रित होऊन विद्यार्थी कृती करतात. धान्य वेगवेगळे करतांना विद्यार्थी सहज ती मोजतात म्हणजे सहजपणे मोजण्याचे कौशल्य त्यांना स्वयंअध्यनातुन निर्माण होते. त्यांच्या स्वयंअध्यनातुन विद्यार्थी कुणी ३ पर्यंत तर कुणी ५ तर कुणी १० तर कुणी १५ पर्यंत संख्या मोजतात.संख्याज्ञान व मोजण्याचे कौशल्य , एकाग्रता व धान्याची ओळख व उपयोग हि उद्दिष्ट या उपक्रमातून आपण साध्य करू शकतो. विशेष म्हणजे यासाठी घरगुती साहित्य चा उपयोग आपण करू शकतो किंवा शालेय पोषण आहारातील धान्याचा उपयोग आपण करू शकतो.

              वर्ग शिक्षिका सौ अनुप्रिता व्याळेकर मँडम ह्या सातत्याने पहील्या  वर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अध्यापण करत असुन आदर्श शाळेतील वर्ग १ ला हा पथदर्शी अभ्यासक्रम आहे तो विद्यार्थ्यांना सहज आकलन व्हावा आनंददायी वाटावा यासाठी कृतीतून शैक्षणिक अध्यापन देण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहे. धान्याची आकृती काढणे, चित्र तयार करणे, फुलांची आकृती करणे, धान्य व फुल पाने यांच्यापासु त्रिकोण चौकोन तयार करून संख्याज्ञान होणे रंगविलले  खडे यांची विभागणी करणे, मोजणे, मनोरंजनात्मक गाणी गोष्ट असे मनोरंजनात्मक शैक्षणिक अध्यापन करून विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी व शिक्षणात गोडी निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे शैक्षणिक कार्य आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे सुरू आहे. बोराखेडी येथील शिक्षक  अशा मनोरंजनात्मक खेळातून  विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातुन विद्यार्थ्यांना आनंदाने देत असल्यामुळे सन २०२१-२२ यावर्षी वर्ग १ ली मधे ५७ विद्यार्थी दाखल झाले आहेत. कोविड काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी असे मनोरंजनात्मक उपक्रम हा ईतर शाळेत राबविल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी निश्चित उपयोगी पडेल असे मत मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले आहे...

Post a Comment

1 Comments