
आदर्श शाळा बोराखेडी येथे वाढदिवसानिमित्त
शालेय साहित्य वाटप.....
उपक्रमशिल जिल्हा परिषद मराठी शाळा बोराखेडी
येथे मोताळा येथील विभागीय युवा सेना अध्यक्ष श्री
सचिन हिरोळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त
बोराखेडी येथील NMMS शिष्यवृत्ती साठी बसलेल्या
10 विद्यार्थ्यांना गाईड वाटप करून आदर्श उपक्रम
राबवला आहे. मुख्याध्यापक अनिल चव्हाण सतत
शाळेतील गरिब वंचित घटकातील विद्यार्थ्यांना
शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी त्यांना मोफत
शैक्षणिक साहित्य मिळावे यासाठी धडपड करत
असतात. आज सचिन हिरोळे यांचा वाढदिवसा
निमित्त फोनवर शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांना
मदतीसाठी विनंती केली. सचिन हिरोळे यांनी लगेच
10विद्यार्थ्यांना शाळेत येऊन स्वतः NMMSशिष्यवृत्ती
परीक्षेच्या गाईड देऊन मदत केली.मुख्याध्यापक
अनिल चव्हाण यांनी त्यांना शुभेच्छा देत सत्कार केला.
सदर शिष्यवृत्तीचा आर्थिक दुर्बल घटकातील
विद्यार्थ्यांना दरमहा 1000 रू शिष्यवृत्तीचा लाभ
मिळणारआहे.यासाठी दहा विद्यार्थी परिक्षेसाठी
ईच्छुक झाले. या परीक्षेसाठी सहभगी विद्यार्थ्यांना
शाळेत विषय शिक्षक एक्सट्रा क्लास घेऊन विशेष
मार्गदर्शन करणार असल्याचे नियोजन मुख्याध्यापक
यांनी केले आहे .
0 Comments