राज्यात पहिली ते पाचवीपर्यंत शाळा
सुरु करण्याबाबत टास्क फोर्सच्या
प्रमुखांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
*शाळा सुरू करण योग्य होणार नाही* मुंबई, 20 नोव्हेंबर:
राज्यातील (Maharashtra) शहरी भागात 8 ते 12वी आणि
ग्रामीण भागात पाचवी ते 12वीचे वर्ग सुरू झाले आहेत. त्यानंतर
आता राज्यात पहिलीपासूनच्या शाळा सुरू (School reopen)
होणार अशी शक्यता वर्तवली जात होती. पहिलीपासूनचे
(Maharashtra primary school reopen) वर्ग सुरू कऱण्यास
शालेय शिक्षण विभागही अनुकूल असल्याची माहिती समोर
आली होती मात्र कोरोना टास्क फोर्सकडून (Corona task force Maharashtra) राज्यातील पहिली ते पाचवी शाळा सुरु
(1st to 5th scho0l reopen in Maharashtra) करण्याबाबत
एक महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे टास्क फोर्सचे प्रमुख
डॉक्टर संजय ओक (Doctor Sanjay Oak) यांनी याबद्दलचा
खुलासा केला आहे. राज्याचा शालेय शिक्षण विभाग जरी
पहिली ते पाचव्या वर्गांपर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत अनुकूल
असेल तरी या वर्गांच्या शाळा सुरु करण्याची ही योग्य वेळ नाही.
पहिली ते पाचवीच्या शाळा सुरु करण्यास टास्क फोर्स अनुकूल
नाही. तसंच विद्यार्थ्यांचं संपूर्ण लसीकरण झाल्याशिवाय शाळा
सुरु करणे योग्य होणार नाही अस मत टास्क
फोर्सचे प्रमुख संजय ओक यांनी व्यक्त केले आहे
0 Comments