* परीपाठ * ❂ दिनांक:~ 17 डिसेंबर 2021 ❂ वार ~ शुक्रवार ![]() आजचे पंचाग ![]() ![]() ━═•●◆❃★❂★❃◆●•═━ *मार्गशीर्ष. १७ डिसेंबर*तिथी : शू. चतुर्दशी (शुक्र)* *नक्षत्र : कृत्तिका,*योग :- सिद्ध* *करण : गरज *सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 17:41,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * सुविचार * ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ * भुंगा सुंगधित फुलांकडे आकर्षला जातो,लक्ष्मी गुणवान,विचारी व्यक्ती लाच उपकृत करते . पाणी नेहमी खालच्या दिशेनेच वहाते, आणि बुद्धी विधिलिखिताप्रमाणेच चालते* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * म्हणी व अर्थ ** उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.** अर्थ :- प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * दिनविशेष * * या वर्षातील 350 वा (लीप वर्षातील 351 वा) दिवस आहे.* * महत्त्वाच्या घटना ** १९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स साँडर्स याची लाहोर येथे हत्या केली.* * २०१६: शरद पवार यांनी एमसीए (मुंबई क्रिकेट असोसिएशन) च्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.* * २०१६: लेफ्टनंट जनरल बिपीन रावत यांची लष्करप्रमुखपदी आणि एअर चिफ मार्शल बी. एस. धनाओ यांची वायुदलप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली.* * जन्मदिवस / जयंती ** १९०५: भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश मुहम्मद हिदायतुल्लाह यांचा जन्म. (मृत्यू: १८ सप्टेंबर १९९२)* * १९२४: पत्रकार, द हिन्दू चे संपादक गोपालन कस्तुरी यांचा जन्म.(मृत्यू: २१ सप्टेंबर २०१२)* * १९७२: अभिनेते व मॉडेल जॉन अब्राहम यांचा जन्म.** १९७८: अभिनेते रितेश देशमुख यांचा जन्म.* * मृत्यू / पुण्यतिथी ** १७४०: पेशवाईतील पराक्रमी सेनापती चिमाजी अप्पा यांचे निधन.** १९३३: १३ वे दलाई लामा थुब्तेन ग्यात्सो यांचे निधन. (जन्म: १२ फेब्रुवारी १८७६)** १९६५: भारतीय भूदलाचे ६ वे सरसेनापती जनरल कोडेन्डेरा सुबय्या तथा के. एस. थिमय्या यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०६)* * २०१९:मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील जेष्ठ अभेनेते डॉ. श्रीराम लागू यांचेनिधन. (जन्म: १६ नोव्हेंबर १९२७)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * सामान्य ज्ञान * ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ * नाशिक शहरातून कोणती नदी वाहते?* * गोदावरी** भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?** कन्याकुमारी** इंग्रजी महिन्याचा शेवट कोणत्या महिन्याने होतो?* * डिसेंबर** गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते?** जयपूर** पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?** विषुववृत्त* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * बोधकथा ** गरीबाची हेटाळणी **प्रयाग (गया) येथे एक खूप चांगले पंडित राहत होते. एकदा नेपाळचे राजे सामान्य वेशात पंडीतामागे फिरू लागले, माझ्या आजोबांचे पिंडदान करून द्या, माझ्याजवल काहीच पैसे नाहीत थोडेसे लाडू भरून आणलेत तेच दक्षिणा स्वीकार करून घ्या. जे लोभी पंडित होते त्यांना पैशाची हाव होती त्यांनी या सामान्य वेशातील राजांना नकार दिला. अशा वेळेस राजांना तेथील एक पंडित गाठ पडला. त्याला महाराजांनी पिंडदान करण्याची विनंती केली. त्याने ती कबूल केली. तो म्हणाला , भाऊ ! पैशाची काही बाब नाही. मी पिंडदान करून देतो. त्या पंडिताने फाटक्या तुटक्या कपड्यात आलेल्या राजांचे पिंडदान पूर्ण करून दिले. यावर महाराज खुश झाले. त्या वेळेस ते त्याला म्हणाले, पंडितजी! या कार्यानंतर काही न काही दक्षिणा मी तुम्हास देणे लागतो. मी घरून काही लाडू आणले आहेत त्याचा तुम्ही स्वीकार करावा.मात्र या लाडूचे गाठोडे तुम्ही घरी जाऊन उघडावे. पंडित म्हणाले , बर भाऊ तुम्ही गरीब दिसत पण तुम्ही प्रेमाने दिलेल्या लाडूचा मी स्वीकार करतो. या नंतर पंडितास ते गाठोडे देऊन राजे निघून गेले. पंडिताने घरी जाऊन जेवायला बसायची तयारी केली. अचानक त्याला लाडूची आठवण झाली त्यावर त्याने ते गाठोडे सोडून पहिले असता तो चकित झाला कारण त्या गाठोड्यात वीस सोन्याचे लाडू होते.* * तात्पर्य:- लोभी पंडितांनी लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली मात्र त्याच गरिबाने वीस सोन्याचे लाडू दिले.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * आजच्या बातम्या ** दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, बारावीची बोर्ड परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिल 2022 दरम्यान तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिल 2022 दरम्यान ऑफलाईन पद्धतीने* * सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने बैलगाडी शर्यतप्रेमींना दिलासा, पुन्हा धावणार सर्जा राजाची जोडी शेतकऱ्यांसाठी आनंदाचा दिवस, आयोजक आणि शर्यतीत भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांकडून ठिकठिकाणी जल्लोष...* * करण जोहरच्या पार्टीत राज्य सरकारमधील मंत्री?, आशिष शेलारांचा गंभीर आरोप शेलारांच्या आरोपावर BMCकडून स्पष्टीकरण* * सरकार हातावर हात ठेवून गप्प बसणार नाही', आम्ही जनतेलाही बांधील; अनिल परब यांचा एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांना इशारा* * बँक खासगीकरणाच्या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांचा केंद्राविरोधात एल्गार; आजपासून दोन दिवसांचा संप* * मुलींच्या लग्नाचं वय आता 18 वरुन 21 करण्याचा केंद्राचा विचार, हिवाळी अधिवेशनात विधेयक सादर होण्याची शक्यता* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ |




सुविचार
भुंगा सुंगधित फुलांकडे आकर्षला जातो,लक्ष्मी गुणवान,विचारी व्यक्ती
म्हणी व अर्थ
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.*
अर्थ :- प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो.*
दिनविशेष
या वर्षातील
१९२८: भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर
सामान्य ज्ञान
बोधकथा
गरीबाची हेटाळणी
*
तात्पर्य:- लोभी पंडितांनी लाडू नको म्हणून गरीबाची हेटाळणी केली मात्र
आजच्या बातम्या
दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर, बारावीची बोर्ड
0 Comments