Subscribe Us

सामान्यज्ञान कोडे ओळखा पाहू मी कोण ?

 


   सामान्यज्ञान कोडे
ओळखा पाहू मी कोण ?

*(१) दिसत नाही कधी कुणाला*
*पण जाणवतो क्षणाक्षणाला*
*छातीच्या पिंजऱ्यात लपून असतो*
*भीती वाटली तर धडधडतो*
*ओळखा पाहू मी कोण ?* 🫀
--------------------------------------

*(२) घर सारविण्यासाठी उपयोग होतो*
 *माझ्यापासून बायोगॅस तयार होतो*
*कुजल्यावर मी खत होतो* 
*ओळखा पाहू मी कोण ?* 
-------------------------------------

*(३) माझ्यापासून बनवितात स्वेटर*
*घोंगडी बनवून वापरतो धनगर*
*थंडी, वाऱ्यापासून बचाव करण्यासाठी 
 माझा वापर*
*ओळखा पाहू मी कोण ?* 
--------------------------------------

*(४) झाडांना मी आधार देतो*
 *क्षार व पाणी शोषून घेतो*
*त्यांना खोडाकडे मी पाठवितो* 
*ओळखा पाहू मी कोण ?*  
-------------------------------------

*(५) तऱ्हेतऱ्हेचे रंग मजेचे*
*वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंधाचे* 
*म्हणून देवालाही आवडतो आम्ही* 
*फळांना जन्म देतो आम्ही*
*ओळखा पाहू आम्ही कोण ?* 
🌺-----------------------------------------
उत्तरे --(१) हृदय (२) शेण (३) लोकर 
(४) झाडाचे मूळ (५) फुले*
==========================
अनिल कनिराम चव्हाण राज्य शिक्षक 
पुरस्कृत मुख्याध्यापक आदर्श जि. प.
 प्रा. शाळा बोराखेडी 

 *माझ्या ब्लाॅगवर ' सामान्यज्ञान माहिती व
 विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी 
खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून
 माहिती मिळवा
 

Post a Comment

0 Comments