Subscribe Us

आदर्श शाळा बोराखेडी येथे सावित्री जिजाऊ अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना स्नेहभोजन व स्पर्धेचे आयोजन.....

          


आदर्श  शाळा बोराखेडी येथे सावित्री 

जिजाऊ अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना 

स्नेहभोजन व स्पर्धेचे आयोजन.....


 ३ जानेवारी सावित्रीबाई फुले व जिजाऊ जन्मोत्सव 

निमित्ताने सन्मान महाराष्ट्राच्या लेकीचा अभियान सुरू झाले 

असून प्रत्येक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करून

 विविध नाविन्यपूर्ण उपक्रम व स्पर्धेचे नियोजन केले आहे.

मोताळा लगत असलेल्या आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे

 ‌आज सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

 नंतर ११ ते १ या वेळेत विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची 

वेशभुषा साकारत "मी सावित्री बोलते" या विषयावर वकृत्व 

स्पर्धा घेण्यात आली. याबाबत अनेक विद्यार्थीनींनी सहभाग

 नोंदवत उत्कृष्ट भाषण व वेशभूषा सादर केली.

         मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी नियमितपणे 

राबविलेला प्रश्न मंजुषा  या विषयावर आज १ ते २ या वेळेत

 परिक्षा घेण्यात आली. तसेच २ वाजता माजी सरपंच सुरेश गर्दे 

यांच्याकडून  शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आज मिष्ठान्न भोजन 

देण्यात आले. मुलिंचे सक्षमीकरण करण्यासाठी बोराखेडी

 शाळेत सतत वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात

 उदा.क्रिडा स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, वकृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा 

रांगोळी स्पर्धा, लेझीम पथक, सांस्कृतिक कार्यक्रम, ठोल पथक,

 मासिक पाळी विषयी मार्गदर्शन, अशा वेगवेगळ्या उपक्रमातून

 मुलींचा सहभाग नोंदवून मुलींना सक्षम करण्यासाठी आवश्यक

 प्रयत्न केला जातो विशेष म्हणजे बोराखेडी येथे ८ महीला

 शिक्षिका सुद्धा कार्यरत असल्यामुळे मुलिंच्या आवश्यक 

गरजा व समस्या सहज सोडविण्यासाठी मदत होते. खर

 म्हणजे बोराखेडी येथील महीला शिक्षिका ह्या मुख्याध्यापक 

यांनी मांडलेल्या शैक्षणिक कल्पनेला प्रत्यक्षात शैक्षणिक 

कार्यात साकारण्यासाठी जी मदत करतात हेच खरे 

सावित्रीबाई यांचे कार्य आहे. कोरोना काळात बोराखेडी 

शाळेने सातत्याने घरोघरी जाऊन मंदिरात जाऊन स्वाध्याय

 देणे शिक्षण देण्यासाठी जे कार्य केले आहे हिच खरी 

सावित्रीबाई यांच्या विचारांची दखल आहे.

               थोर पुरुषांच्या प्रतिमेला हार तुरे घालने म्हणजे 

जयंती साजरी करण्याचे  उद्दिष्ट नव्हे. थोर पुरुषांच्या विचारांची 

अंमलबजावणी होणे, त्यांचे विचार स्वतः अंगिकारने हे खरे

जयंती उत्सवाचे उद्दिष्ट आहे. सन २०२१-२२ या शैक्षणिक

 वर्षापासून १ जुलैपासून कोरोना काळात सुद्धा नियमितपणे

 विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सर्व 

शिक्षकांनी मनापासून कार्य केले आहे हे कौतुकास्पद आहे

आणि या शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यामुळे गरिब वंचित

विद्यार्थ्यांना आज उत्कृष्ट शिक्षण मिळत आहे हेच तर खरे

सावित्रीबाई फुले यांना अभिवादन आहे. तसेच शिवाजी चहकर 

यांनी ५००० रु ठेव देऊन विद्यर्थ्याना मदत केली  सातत्याने

 विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी बोराखेडी 

येथील मुख्याध्यापक शिक्षक जी मेहनत घेत आहेत त्यामुळे 

आज शाळेतील विद्यार्थी संख्या ४१२ पर्यंत वाढली आहे हेच

 खरे शाळेचे सर्वात मोठे यश आहे.

Post a Comment

0 Comments