Subscribe Us

आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे न्युट्रिटीव्ह स्लाइस बिस्किटे वाटप

        


आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे 

न्युट्रिटीव्ह स्लाइस बिस्किटे वाटप

            शालेय पोषण आहार योजनेंतर्गत वर्ग 1 ते ८

 च्या विद्यार्थ्यांना शाळेत दुपारी खिचडी मिळत होती 

परंतू कोरोनामुळे मध्यंतरी शाळा बंद होत्या त्यामुळे

 विद्यार्थ्यांना पोषक तत्व मिळाले नाही काही महीने

 विद्यार्थ्यांना शाळेत तांदुळ व दाळीचे वाटप करण्यात

 आले.जुलै २०२१ पासुन परत शाळा सुरू झाल्या नंतर 

शाळेत जास्त गर्दी होऊ नये म्हणून नाचणी, ज्वारी ,

बाजरी, सोयाबीन व तांदुळ यांची पोषक तत्व असणारी 

न्युट्रिटीव्ह स्लाईस वाटप करण्याचे निर्देश शाळेला दिले

आहे त्यानूसार उपक्रमशील आदर्श जि प शाळा बोराखेडी 

येथे शुक्रवारी न्युट्रिटीव्ह स्लाइस बिस्किट पुडे प्राप्त झाले

सदर बिस्किटे हे कसे वाटप करावे त्याबाबत परिपत्रक 

मिळाले असुन वर्ग 1 ते 5 च्या विद्यार्थ्यांना 6 पुडे व 6 ते 8

 च्या विद्यार्थ्यांना 9 पुडे अशा प्रमाणात मुख्याध्यापक 

अनिल चव्हाण यांनी शुक्रवारी व शनिवारी सर्व विद्यार्थ्यांना 

शाळा बंद होण्याआधीच सुरक्षित पुणे न्युट्रीटीव्ह स्लाइस

बिस्किटे वाटप केली . सदर पोषक तत्व असणारी न्युट्रिटीव्ह 

स्लाइस बिस्किटे विद्यार्थ्यांना मिळाल्याने विद्यार्थ्यांमधे

 आनंदाने वातावरण निर्माण झाले असुन आता कोरोना

 काळात विद्यार्थ्यांना सदर पोषण आहार घरी नियमितपणे 

4,4 बिस्किटे खाण्याच्या सुचना सुद्धा देण्यात आल्या आहेत. 

कोरोना काळात विद्यार्थ्यांना शारीरिक पोषक तत्व वाढीसाठी

 सदर न्युट्रिटीव स्लाइस चा उपयोग चांगल्या प्रकारे 

होऊन विद्यार्थ्यांना आरोग्यदायी ठरेल.सदर कार्यात 

शाळेतील सर्व शिक्षकांनी सहभाग नोंदवला होता.

Post a Comment

0 Comments