Subscribe Us

माझ्याकडून आपणास नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!!*



माझ्याकडून आपणास  नववर्षाच्या
 मनःपूर्वक शुभेच्छा.!!!*

सरत्या वर्षाने खूप काही शिकवलं

सरत्या वर्षात नात्यांचा अर्थ कळला 
सरत्या वर्षात श्वासांचा अर्थ कळला
सरत्या वर्षात मैत्रीचा गंध कळला
सरत्या वर्षात स्नेहाचा बंध कळला

सरत्या वर्षात माणुसकी नावाचं एक
सुंदर बेट पहिलं...
सरत्या वर्षात आशा निराशेचा एक गूढ
खेळ पाहिला...
प्रत्येकासाठी विधात्याने खेळ मांडून
ठेवलेला असतोच...
पण जिंकायचं म्हणून धावत सुटताना
हवी असते भक्कम साथ ....
हीच मोलाची साथ आपण प्रत्यक्ष ..
अप्रत्यक्षपणे दिलीत ....
असेच सदैव सोबत रहा .....
नकळत माझ्याकडुन कधीतरी आपलं मन
दुखावलं गेलं असेल ..
त्याबद्दल ..माफी असावी...

   वर्ष निसटले चोरपावली
  उरले होऊन तारीख केवळ
      संकल्पाचे नवे धुमारे
 पुन्हा झटकतील सारी मरगळ
     चुकले त्याला अनुभव म्हणुनी
     हुकले त्याला हसून टाळू
 डाव तोच पण मांडू नव्याने
 जोवर शिल्लक मुठीत वाळू..

*नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.!!!*
              *आपलाच *
          *अनिल चव्हाण*

Post a Comment

0 Comments