Subscribe Us

विज्ञान शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला विज्ञान प्रदर्शनाने सलामी.

 






विज्ञान शिक्षकांच्या सेवानिवृत्तीला विज्ञान प्रदर्शनाने सलामी.

आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे सतत वेगवेगळे उपक्रम राबविण्यात

 येतात जिल्ह्यातील उपक्रमशील आदर्श शाळा म्हणून बोराखेडी शाळेची 

ओळख आहे. मुख्याध्यापक अनिल चव्हाण व शिक्षक आपल्या कल्पकतेने

 सातत्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून 

विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी प्रयत्नशील 

आहेत. आज २८ फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवसानिमित्त आदर्श जि प शाळा

बोराखेडी येथील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ५० विज्ञान 

प्रयोगाची प्रदर्शनी मांडली व आजचा योगायोग बोराखेडी येथील श्री महेन्द्र

 कुमार तायडे विज्ञान शिक्षक सेवानिवृत्त होत आहे. श्री तायडे विज्ञान शिक्षक

 यांच्या सेवानिवृत्तीला विज्ञान प्रदर्शन म्हणजे त्यांना आजच्या दिवशी दिलेली

 ५० विज्ञान प्रयोगाची अविस्मरणीय सलामी आहे. विज्ञान प्रदर्शनीने विद्यार्थ्यांच्या

 कलागुणांना कल्पकतेला सर्जनशीलतेला सुप्त गुणांना वाव मिळाली असुन त्या 

एक वेगळ्या तंत्रज्ञानाची दिशा व चालना मिळत असते. आणि अशा छोट्या

छोट्या विज्ञान प्रयोगातुनच भविष्याचे शास्त्रज्ञ निर्माण होत असतात. मागील

वर्षी २०२० घ्या विज्ञान प्रदर्शनात ९० प्रयोग बोराखेडी येथील विद्यार्थ्यांनी मा़डले 

होते. परंतू नंतर कोरोना काळात शाळेला सुट्टी असल्याने विद्यार्थ्यांना तब्बल एक

वर्षानंतर स्वतःची कल्पकता सादर करण्याची ही खूप मोठी संधी मुख्याध्यापक 

अनिल चव्हाण यांनी निर्माण करून दिली आहे. या विज्ञान प्रदर्शनीमुळे विद्यार्थ्यांमधे 

आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असुन सेवानिवृत्त होत असलेले तायडे 

सर यांचा शेवट खुप गोड झाला आणि शेवटपर्यंत प्रदर्शनी बघत आपल्या विषयात 

विद्यार्थ्यांंसोबत रममाण झाले ही एक विशेष बाब आहे. या प्रदर्शनाला प स उपसभापती

रावसाहेब देशमुख यांनी विशेष भेट दिली. विज्ञान शिक्षकांच्या सेवानिवृत्तीसाठी 

शाळा समिती अध्यक्ष किशोर चहाकर रावसाहेब देशमुख के प्र जवरे सर यांची 

खास उपस्थिती होती. शाळा समिती अध्यक्ष किशोर चहाकर, प स उपसभापती

रावसाहेब देशमुख के प्र जवरे सर  मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी विज्ञान 

शिक्षक श्री महेन्द्र कुमार तायडे यांचा यथोचित सत्कार सन्मान करून भेटवस्तू 

देत सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात सौ अनुप्रिता व्याळेकर,सौ 

सुनिता हुडेकर सौ वामिंद्रा गजभिये सौ सिमा गोरे, सुनिता न्हावकर, सुनंदा इंगळे, 

संध्या नाईक जया चव्हाण यांनी अमुल्य योगदान दिले तसेच विद्यार्थी मोठ्या 

प्रमाणात उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments