राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात 1 एप्रिल पासून सुधारणा
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात 1 एप्रिल पासून सुधारणा करण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे होते.एस-२० व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समुह नागपूर नागरी समुह व पुणे नागरी समुहास ५४०० रू व इतर ठिकाणी २७०० रू , एस -१७ ते एस-१९ या स्तरासाठी अनुक्रमे २७०० ते १३५० रू ,एस-१ ते एस ६ साठी १००० ते ६५० रू उपरोक्त एस -१ ते एस-६ या वेतन स्तरामधील २४२०० रू व त्यापेक्षा जास्त वेतन आहारित करणाऱ्या बृहन्मुंबई नागरी समुह नागपूर नागरी समुह व पुणे नागरी समुह मधील कर्मचाऱ्यांना २७००रू व इतर ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांना १३५० रू इतका वाहतूक भत्ता मिळेल
तसेच अंध अपंग अस्थिव्यंग मुकबधीर यांना राज्य शासकीय व इतर कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता पुढीलप्रमाणे देत राहील. एस -२० व त्यावरील वेतन स्तरातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना बृहन्मुंबई नागरी समुह, नागपूर नागरी समुह व पुणे नागरी समुहास १०८०० रू व इतर ठिकाणी ५४०० रू एस-७ ते एस-१९ स्तरासाठी ५४०० व २७०० रू एस -१ ते एस-६ स्तरासाठी २२५० अशी सुधारणा असेल.एस-१ ते एस-६ या वेतन स्तरामधील २४२०० व त्यापेक्षा जास्त वेतन आहारित करणाऱ्या बृहन्मुंबई नागपूर व पुणे नागरी समुहामधील कार्यरत कर्मचाऱ्यांना २७०० रू इतका वाहतूक भत्ता अनुदेय राहील. यासाठी ७०० कोटी रू इतका खर्च अपेक्षित आहे अशा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत पारित करण्यात आला .
0 Comments