16 मार्च रोजी 3% महागाई भत्ता वाढ होणार?
7th Pay Commission Update
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 16 मार्च रोजी मोठी आनंदाची बातमी मिळण्याची
शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) तीन
टक्क्यांनी वाढ होणार आहे. पहिल्या कर्मचाऱ्यांना 31 टक्के दराने
महागाई भत्ता मिळतो, मात्र तो 34 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात येणार
आहे, म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे.
जानेवारीत जाहीर होणार वाढ
सरकार होळीपूर्वीच महागाई भत्ता वाढवण्याची घोषणा करू शकते.
कर्मचार्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2022 पासून वाढवला जाणार होता.
परंतु आता सरकार 16 मार्च रोजी डीए वाढवण्याची घोषणा करू शकते
असे मानले जात आहे.
16 मार्च रोजी होऊ शकते बैठक
सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर
महागाई भत्ता जाहीर केला जातो. यावेळी 16 मार्च रोजी होणाऱ्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा
करू शकते, असे मानले जात आहे. सध्या निवडणुकीमुळे लागू झालेल्या
आचारसंहितेमुळे वाढ जाहीर झालेली नाही.
जुलैमध्ये पुन्हा केली जाणार DA मोजणी
केंद्र सरकारच्या या निर्णयाचा लाभ 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचारी
आणि 65 लाख पेन्शनधारकांना मिळणार आहे. याशिवाय, जुलै 2022 मध्ये
पुन्हा महागाई भत्त्याची मोजणी केली जाईल. अशी विशेष सूत्राकडून माहिती
मिळाली आहे
0 Comments