Subscribe Us

शासन सेवेत 33 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार

 

शासन सेवेत 33 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार 

                      राज्यातील शासन सेवेमध्ये 33 वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना एक धक्कादायक बातमी समोर आली आहे .ती म्हणजे शासन सेवेत 33 वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे .यामुळे काही कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची भीती निर्माण , झाली आहे .

महाराष्ट्र शासन सेवेमध्ये वर्ग – 4 संवर्गामध्ये , 33 वर्षा पेक्षा जास्त सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे . कारण  वर्ग – 4 साठी शैक्षणिक अट कमी आहे .त्याचबरोबर वर्ग – 4 पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया महाराष्ट्र शासनाकडून राबविण्यात येत होत्या .आता शासनाने वर्ग – 4 पदे मानधन तत्वावर भरण्यात यावे .असा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

                  यामुळे यापुढे वर्ग – 4 पदांसाठी कायमस्वरूपी पदे भरण्यात येणार नाहीत . राज्य शासनाने 33 वर्षे सेवानियम बाबत प्रस्ताव तयार केला आहे .या सेवानियम मध्ये ज्या कर्मचाऱ्यांचे 33 वर्षे सेवा पूर्ण झाली आहे .अशा कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे .

यामुळे ज्या कर्मचाऱ्यांचे 33 वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे .अशा कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिनांकापुर्वीच सेवानिवृत्त होण्याची भीती निर्माण झाली आहे .याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाने प्रस्ताव तयार केला आहे . या प्रस्तावाला लवकरच मंजूर देण्यात येणार आहे .

Post a Comment

0 Comments