आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे पर्यावरणपूरक होळी साजरी.
आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्याचप्रमाणे आज होळीचा सण साजरा करण्यात आला. मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी शालेय परिसरात गुटखा, तंबाखू, विडी, व प्लास्टिक पिशव्या यांची होळी करुन त्यांचे महत्त्व व दुष्परिणाम समजावून सांगितले.प्लास्टिकच्या पिशवीत असलेले अन्न पदार्थ खाऊ नये प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नये पालकांना तंबाखू विडी गुटखा खाण्यापासून प्रवृत्त करावे तसेच आपल्या मनातील द्वेष मत्सर वाईट भावना होळीमधे जाळून टाकवे व सर्वांशी प्रेमाने वागा असे मार्गदर्शन मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी केले. तसेच पळसाचा कोरडा रंग कसा करावा हे सांगून आरोग्यास उपयुक्त असे कोरड्या रंगाची होळी खेळून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. होळी या सणाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी शाळेतील शिक्षिका सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ वामिंद्रा गजभिये सौ सिमा गोरे सुनिता न्हावकर सुनंदा इंगळे जया चव्हाण ह्या उपस्थित होत्या..
0 Comments