Subscribe Us

शिक्षकांना वैयक्तिक बदली प्रक्रिया पोर्टलवर भरण्याबाबत आवश्यक माहिती

 


शिक्षकांना वैयक्तिक बदली प्रक्रिया पोर्टलवर भरण्याबाबत आवश्यक माहिती


➡️ Teacher transfer portal वर  phase 1 मध्ये teacher data updation यामध्ये सर्व शिक्षकांना स्वतःची वैयक्तिक माहिती मोबाईल नंबर व ओटीपी च्या माध्यमातून login करून भरावयाची आहे.

➡️ यामधील employee details मध्ये आपली वैयक्तिक माहिती भरलेली असेल त्यामध्ये शिक्षक कोणतेही बदल करू शकणार नाहीत.

➡️ परंतु  employment details यामध्ये आपण आपली कार्यरत शाळेतील तपशील, एकूण सेवेचा तपशील ,तसेच इतर सेवा संबंधी माहिती बदलू शकतो किंवा नवीन add करू शकतो.

➡️ संपूर्ण माहिती तपासून submit केल्यानंतर ही माहिती मान्यते करीता गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठविली जाईल. 

➡️ गटशिक्षणाधिकारी हे संबंधित शिक्षकांची माहिती transfer portal वर लॉगिन करून पाहू शकतात अथवा काही चुकीची माहिती असल्यास दुरुस्त करू शकतात.

➡️ संबंधित शिक्षकांची माहिती गटशिक्षणाधिकारी यांनी verify केल्यानंतर ही माहिती शिक्षणाधिकारी यांच्याकडे पाठवली जाईल.

➡️ संबंधित माहिती शिक्षक transfer portal वर login करून पाहू शकतात.

➡️ गटशिक्षणाधिकारी यांनी दुरुस्त केलेली माहिती शिक्षकास मान्य नसल्यास  त्या संदर्भात शिक्षक  शिक्षणाधिकारी यांच्याकडे portal वर online  अपील करू शकतात.

➡️ यामध्ये  शिक्षणाधिकारी transfer portal वर login करून जिल्ह्यातील संपूर्ण  शिक्षकाची माहिती व अपील पाहू शकतात शिक्षणाधिकारी सदर माहितीची शहानिशा करून बरोबर असल्यास submit करतील अथवा नव्याने बदल करायचा असल्यास बदल करून submit करतील

➡️ अशाप्रकारे शिक्षणाधिकारी यांनी बदल केलेले शिक्षकांचे profile शिक्षक पुन्हा बदलू शकणार नाहीत

ती माहिती  शिक्षकांना read only mode वर दिसेल

➡️ शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांचे update केलेले profile शिक्षक लॉगिन करून पाहू शकतात

➡️ संबंधित अपडेट केलेले प्रोफाइल  व माहिती शिक्षकांनी वाचावी व except करावी अशाप्रकारे शिक्षकांची except केलेली माहिती Teacher transfer portal वर अपडेट केली जाईल

➡️ Teacher transfer portal वर अपडेट केलेल्या माहितीच्या आधारे बदली प्रक्रिया राबवली जाईल

✳️ बदली प्रक्रिया राबविण्याकरिता VC च्या माध्यमातून खालील सूचना देण्यात आल्या.

✳️ सन 2022 मधील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदल्या ह्या ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments