मराठी व्याकरण विभक्ती व विभक्तीचे प्रकार
विभक्ती :
वाक्यात जे शब्द येतात, ते त्यांच्या मूळ स्वरूपात जसेच्या तसे सामान्यतः येत नाहीत. वाक्यात वापरताना त्यांच्या स्वरूपात बदल करावा लागतो.
उदा. – शेजारी, मधू, रस्ता, कुत्रा, काठी, मार’ असे शब्द एकापुढे एक ठेवल्याने काहीच बोध होत नाही,या शब्दसमूहाला वाक्य म्हणता येत नाही.
ते वाक्य होण्यासाठी ‘शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.‘ अशा स्वरूपात शब्दरचना करायला हवी.
वाक्यातील शब्दांचा संबंध दाखविण्यासाठी नाम किंवा सर्वनाम यांच्या स्वरूपात जो बदल किंवा विकार होतो, त्याला व्याकरणात विभक्ती असे म्हणतात.
नामे व सर्वनामे यांचे वाक्यातील क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी येणारे संबंध ज्या विकारांनी दाखविले जातात त्या विकारांना विभक्ती असे म्हणतात.
प्रत्यय आणि सामान्यरूप
नामाचे किंवा सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यांस असे म्हणतात.
“शेजारच्या मधूने रस्त्यात कुत्र्याला काठीने मारले.’ या वाक्यात ‘च्या, ने, त, ला’ हे विभक्तीचे प्रत्यय होत.
हे विभक्तीचे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या किंवा सर्वनामाच्या स्वरूपात जो बदल होतो, त्याला सामान्यरूप
असे म्हणतात.
‘रस्त्या’ व कुत्र्या’ ही रस्ता व कुत्रा या नामांची सामान्यरूपे होत व रस्त्यात’, ‘कुत्र्याला’ ही विभक्तीची रूपे होत.
पुढील मूळ शब्दात कसा बदल होतो, तसेच सामान्यरूप व विभक्तीचे प्रत्यय दिसून येतील.
विभक्तीची रूपे. मूळ शब्द
भावाला. भाऊ, रामाला. राम
सामान्यरूप. विभक्तीची रूपे.
भावा. ला
रामा. ला
विभक्तीचे प्रकार
प्रत्येक वाक्य म्हणजे एक विधान असते.
यात क्रियापद हा प्रमुख शब्द होय.
ही क्रिया करणारा वाक्यात कोणीतरी असतो. त्याला कर्ता असे म्हणतात,
ही क्रिया कोणावर घडली? कोणी केली? कशाने केली? कोणासाठी केली? कोठून घडली? कोठे किंवा केव्हा घडली? हे सांगणारे शब्द वाक्यात असतात
नामांचा क्रियापदांशी किंवा इतर शब्दांशी असणारा संबंध अशा आठ प्रकारचा असतो; म्हणून
विभक्तीचे एकंदर आठ प्रकार मानले जातात.
(१) प्रथमा,
(२) द्वितीया,
(३) तृतीया,
(४) चतुर्थी,
(५) पंचमी,
(६) षष्ठी,
(७) सप्तमी,
(८) संबोधन.
यांतील पहिल्या सातांना संस्कृतातील नावे दिली आहेत. आठव्या संबंधाच्या वेळी हाक मारली जाते म्हणून त्याला ‘अष्टमी’ असे न म्हणता ‘संबोधन’ असे नाव दिले आहे. (संबोधन – हाक मारणे, बोलावणे.)
या विभक्तींचे प्रत्यय कोणते व त्यामुळे नामाच्या स्वरूपात कोणते बदल होतात, हे पुढील प्रमाणे आहे.
विभक्तीचे प्रत्यय व ‘फूल’ या नामाची होणारी रूपे
एकवचन विभक्तीची प्रत्यय
(१) प्रथमा,
(२) द्वितीया, स,ला,ते
(३) तृतीया, ने,ए, शी
(४) चतुर्थी, स,ला,ते
(५) पंचमी, ऊन,हून
(६) षष्ठी, चा,ची,चे
(७) सप्तमी, त,ई, आ
(८) संबोधन, –
शब्दांचीरूपे --
फूल फुलास, फुलाला फुलाने, फुलाशी
फुलास, फुलाला फुलाहून फुलांचे-ची-चे
फुलात फुला
अनेकवचन प्रत्यय शब्दांची रूपे
– फुले --स,ला,ना,ते फुलांस, फुलांना
नी, शी, ई, ही फुलांनी फुलांशी
स,ला,ना,ते फुलांस, फुलांना
ऊन,हून फुलांहून चे,च्या,ची फुलांचे-च्या-ची
त, ई, आ फुलांत ,नो- फुलांनो
0 Comments