Subscribe Us

कुछ किए बिना जयजयकार नहीं होती कोशिश करणे वालो की कभी हार नहीं होती....






कुछ किए बिना जयजयकार नहीं होती कोशिश करणे वालो की कभी हार नहीं होती....

          मुख्याध्यापक अनिल चव्हाण राज्य आदर्श पुरस्काराने सन्मानित

                                  औरंगाबाद येथील प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने महाराष्ट्रातील कोरोना काळात विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन शिक्षण दिले  व कोरोना काळात शाळा सुरू ठेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले अशा 65 शिक्षकांना राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थी हेच दैवत समजून विविध उपक्रम राबवून आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी सन 20-21 मधे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी घरोघरी जाऊन, मंदिरात वर्ग घेऊन शिक्षण दिले, तसेच सन 21-22 मधे पुर्णवेळ शाळा सुरू ठेऊन विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे अविरतपणे कार्य केले आहे. याच कार्याची दखल घेऊन औरंगाबाद येथील प्रगती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन अनिल चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.

                                                  अनिल चव्हाण सदर पुरस्काराचे श्रेय आपल्या शाळेतील सर्व शिक्षकांना देऊन त्यांना समर्पित करत आहे. सदर पुरस्कार सोहळ्यात प्रगती बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रोहित गिरी, राजीव वाघ, शिक्षण अधिकारी श्रीमती जयश्री चव्हाण,छाजेड साहेब असे अनेक मान्यवर हजार होते अनिल चव्हाण यांच्या सोबत पुरस्कार स्वीकारताना बुलढाणा येथील ज्ञानरचनावाद शाळा पुरस्कृत शिक्षक राजू साळवे उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments