Subscribe Us

जिल्हाअंतर्गत बदलीला सुरवात, संचमान्यता सन.२०२१- २२ व बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण निर्णय

 



जिल्हाअंतर्गत बदलीला सुरवात, संचमान्यता सन.२०२१- २२ व बदली प्रक्रियेबाबत महत्वपूर्ण निर्णय 

     विदयार्थी संचमान्यता सन २०२१- २२  बाबत कार्यवाही अंतिम टप्प्यात असून आज दि.२८ एप्रिल २०२२ रोजी प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर साहेबांनी संचमान्यता बाबतचा आढावा सर्व शिक्षणाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये एका विसी द्वारे घेतला आहे. या विषयाच्या अनुषंगाने आज शिक्षण राज्यमंत्री कार्यालयाकडून देखील माहिती घेण्यात आली. 

या प्रसंगी संचमान्यता २०२१-२२ ही अंतिम टप्प्यात असून शिक्षण संचालक यांच्या दिनांक २८ फेब्रुवारी २०२२ च्या पत्रा द्वारे एक ते पाच मुद्द्यांची समितीमार्फत पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. पडताळणी समितीद्वारे देण्यात आलेला अहवाल सरल पोर्टल वर भरण्यासाठी लॉगिन ची सुविधा आज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या अहवालानुसार गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्या लॉगीन वरून संच मान्यता अंतिम करण्यात येणार आहे.मात्र अद्यापही काही शाळांची कामे व पडताळणी राहिल्याचे दिसून आले. तरी पडताळणी सह सरल पोर्टल वर विद्यार्थी पटसंख्या चा अंतिम अहवाल भरण्यासाठी एक आठवड्याचा अवधी शिक्षण संचालकांच्या स्तरावरून देण्यात आलेला आहे. दिनांक 6 मे रोजी पर्यंत संच मान्यता २०२१-२२ अंतिम होणार असून त्यानंतर जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त व अतिरिक्त पदे स्पष्ट होतील .पश्चात लगेच अतिरिक्त शिक्षकांचे  ऑफलाइन समायोजन प्रक्रिया होणार आहे. समायोजन प्रक्रियेनंतर निवड रिक्त पदे व समानीकरण ची रिक्त पदे स्पष्ट होणार आहे.पळताळणी समितीचा अहवाल अपूर्ण अथवा काही शाळांची संचमान्यता अपूर्ण असल्यास त्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हाअंतर्गत बदलीला सुरवात

संच मान्यता 2021 22 व त्यानंतर ऑफलाईन समायोजन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया ला नव्याने विकसित करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे सुरुवात होणार आहे साधारण  15 मे पर्यंत जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सुरू होणार असल्याचे चित्र आहे. याबाबत ग्राम विकास स्तरावरून अधिकृत सूचना निर्गमित होणार आहेत.

राज्यातील बदली प्रक्रियेबाबत अनेक शिक्षकांची विचारणा होत असल्याने ही माहिती त्यांच्या सोईकरिता देण्यात येत आहे.

आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत रोस्टर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात असून रोस्टर तात्काळ अद्यावत करण्याच्या सूचना शासन स्तरावरून देण्यात आल्या आहेत.रोस्टर ची माहिती ही शिक्षणाधिकारी व नंतर सिईओ यांच्या स्वतंत्र लॉगिन वरून वेरीफाय करून ग्रामविकास स्तरावर फॉरवर्ड केली जाणार आहे.सर्व जिल्ह्यांचे रोस्टर अंतिम झाल्यावर विकसित होणाऱ्या संगणक प्रणालीवर प्रायोगिक तत्वावर बदली प्रक्रिया केली जाणार असून तदनंतर बदली प्रक्रियेला सुरवात होणार आहे .आंतरजिल्हा बदली प्रक्रियेबाबत सविस्तर व वस्तुनिष्ठ माहिती कलमर्यादित कार्यक्रमसह लवकरच देण्यात येईल.

Post a Comment

0 Comments