Subscribe Us

बोराखेडी येथील मुख्याध्यापक यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन साजरा....

 





 बोराखेडी येथील मुख्याध्यापक यांचा वाढदिवस विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन साजरा....

       आदर्श जि प शाळा बोराखेडी शाळा नाविन्यपूर्ण उपक्रमशिल म्हणून प्रसिद्ध आहे.सतत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम शाळेत राबविले जातात. मग शाळेतील शिक्षक असोत व गावकरी हे आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही निमित्ताने विद्यार्थ्यांना काही तरी देत असता. शाळेतील मुख्याध्यापक यांनी शिक्षकांनी आपल्या वाढदिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करणे खाऊ वाटप करणे असा उपक्रम सुरू केलेला आहे. आज मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांचा वाढदिवस त्यांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देऊन विद्यार्थ्यांंमधे साजरा केला. खर तर शाळेतील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करण्यामुळे एक वेगळा आनंद वेगळाच अनुभव असतो. विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या वस्तू जरी  दिल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद व प्रसन्नता दिसुन येते आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व प्रसन्नता बघुन स्वतःला जे समाधान मिळते त्याची तुलना कशातच होत नाही.

                       वाढदिवसानिमित्त शाळेत विद्यार्थ्यांना साहित्य किंवा खाऊ देण्यासाची परंपरा हि पाच वर्षांपासून सतत सुरू आहे. अनेक गावकरी व मान्यवरांनी आपल्या वाढदिवशी शाळेत विद्यार्थ्यांना मदत केली आहे त्यामुळे या गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रेरणा व प्रोत्साहन मिळते तसेच शिक्षकांना सुध्दा उत्कृष्ट काम करणाची ऊर्जा निर्माण होते. म्हणतात ना दिव्याने दिवा लावला की प्रकाशाची ज्योत निर्माण होते तसेच ज्ञान दानाला दानशूर व्यक्तींचा हात लावला तर तिथे भविष्यातील उज्वल पिढीची सुसंस्कृत माळ तयार होते. 

                                      शेवटी देण्यासाठी वृत्ती महत्वाची असते मग छोटंसं रोपट का असेना शेवटी त्याला रसाळ गोमटी फळ लागणार हे निश्चित. म्हणून आपल्या वाढदिवशी निश्चितच गरजवंताला मदत करा, वृक्ष लावा, पर्यावरणाचे रक्षण करा हाच जगण्याचा खरा माणूसकी धर्म आहे, असे प्रांजळ मत मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले व शाळेतील सर्व शिक्षिका व विद्यार्थी यांच्या शुभेच्छांचा मनापासून आभार व्यक्त केले तसेच मुख्याध्यापक अपग्रेड संघटना व अपंग संघटनेच्या वतीने व शिक्षकांच्या वतीने समाजतील सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारून आभार मानले  


Post a Comment

0 Comments