पोर्टल वर माहिती भरतांना कोणती काळजी घ्यावी
(१) आपली प्रत्येकाची सेवाविषयक माहिती तपासून अद्ययावत करण्यासाठी गशिअ स्तरावर Submit करणे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक आहे.
(२) आपली सेवा विषयक माहिती गटशिक्षणाधिकारी स्तरावर Submit केल्यानंतर त्या ठिकाणी आपले मूळ सेवा पुस्तक व आवश्यक रेकॉर्ड पडताळणी करण्यात येत आहे.
याबातचा sms आपल्या मोबाईलवर येतो तसेच E-Mail वरही संदेश येतो. Portal Login करून आपल्याला BEO कडून Verify झालेल्या माहिती पाहता येते.
(अ) आपण भरलेली माहिती सेवा पुस्तकाप्रमाणे बरोबर असल्यास- Teacher Profile is updated by BEO या अंतर्गत Correct Information असा संदेश येतो.
आपण भरलेली माहिती बरोबर असल्यास वाचून Accept करणे गरजेचे आहे.
(२) आपण अद्ययावत करून Submit केलेली माहिती गटशिक्षणाधिकारी स्तरावरून सेवा पुस्तकाच्या नोंदीत व आपण अद्ययावत केलेल्या माहितीत फरक असल्यास- गटशिक्षणाधिकारी स्तरावरून फरक असलेल्या माहितीत सेवा पुस्तकाप्रमाणे बदल केल्याचे आपल्याला संदेशात दिसून येते.
गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने आपल्या स्तरावरून केलेला बदल आपल्याला मान्य असल्यास सदर बदल Accept करावा लागतो.
मात्र हा बदल आपल्याला मान्य नसल्यास शिक्षणाधिकारी स्तरावर आपल्याला आपल्याच लॉगीन वरून (त्याच ठिकाणी) मा. शिक्षणाधिकारी यांचे कडे Apeal करावे लागते.
*_संक्षिप्तपणे अशाप्रकारची थोडक्यात प्रक्रिया आहे. यासाठी प्रक्रिया समजून घेणे व आपली सेवा विषयक माहिती अचूक भरणे आणि चूक असल्यास दुरुस्तीसाठी अपील करणे ही प्रक्रिया फार महत्त्वाची आहे_.*
(३) आपण आपली सेवा विषयक माहिती निर्धारित मुदतीत अद्ययावत न केल्यास-- *गटशिक्षणाधिकारी स्तरावरून त्यांच्याकडे असलेल्या रेकॉर्डच्या आधारे माहिती बरोबरच आहे हे गृहीत धरून सक्तीने अद्ययावत केली जाणार आहे.*
त्यामुळे बदलीस पात्र असो अथवा नसो प्रत्येक शिक्षकाने आपली सेवा विषयक माहिती योग्य आहे अशा कोणत्याही ठिकाणावरून गशिअ स्तरावर Submit करावीच.
(४) पोर्टल ओपन केल्यावर आपण लॉगिन झाल्यावर बाहेर पडताना/बंद करताना *Logout* होणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा पुढे लॉगिन होताना अडचणी निर्माण होतात.
(५) सध्या बदली प्रक्रियेची माहिती भरण्यासाठी लॉगिन होत असताना प्रत्येक वेळी आपल्याला OTP येत आहे.
*_कृपया कुणी बाहेरच्या अपरिचित व्यक्तिने फसवणूक करण्याच्या उद्देशाने (बदलीच्या नावाखाली) आपल्या मोबाईलवर वर एखादा Fake OTP वा अन्य Bank ATM, Aadhar विचारून कोणतीही माहिती मागीतल्यास कुणालाही OTP शेअर करू नये._*
ऑनलाइन संबंधांच्या तज्ज्ञांकडून समजून घेऊन आणि बारकावे समजून घेत आवश्यक माहिती आपल्या बांधवांसाठी आणि प्रसारित करीत आहोत. समज-असमजामुळे या माहितीत काही त्रुटी असू शकतात. अधिकाधिक योग्य माहितीसाठी आपण आपला विश्वास असणाऱ्या तज्ज्ञांकडे, जाणकारांकडे जाऊन अधिक अचूक माहिती घेणे योग्य राहील.
0 Comments