आदर्श जिल्हा परिषद बोराखेडी शाळेत वसंतराव नाईक जयंती कृषीदिन म्हणून साजरा
आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे वृक्षारोपण करून वसंतराव नाईक जयंती साजरी.
1 जुलै महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहीलेले हरित क्रांतीचे जनक ,शेतकऱ्यांचे कैवारी बहुजनांचे रक्षक, आधुनिक भारताचे कृषिसंत , वसंतराव नाईक यांची जयंती संपुर्ण महाराष्ट्रात कृषीदिन म्हणून साजरी करतात. आदर्श जि प शाळा बोराखेडी येथे वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त 5 वृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले,व वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांच्या हस्ते करून सर्व शिक्षकांनी प्रतिमेला अभिवादन केले.
मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. जर दोन वर्षात महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपुर्ण झाला नाही तर मी स्वतः फासावर लटकेन असे जाहीरपणे सांगून अत्यंत कठीण दुष्काळी परिस्थिती शेतकरी असतांना नविन संकरित धान्य निर्मिती करून शेतकऱ्यांना प्रगतिशील बनविण्यासाठी वसंतराव नाईक यांचे खुप मोठे योगदान आहे. आज राज्यात पंचायत राज कमिटी, जलसंधारण योजना श्वेतक्रांती व रोजगार हमीचे जनक त्यांना म्हटल्या जाते अशा अनेक योजना त्यांनी निर्माण करून महाराष्ट्र विकास साधण्यासाठी योगदान दिले.
जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना बिस्किटे खाऊ वाटप केले. यावेळी शाळेतील शिक्षक सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ वामिंद्रा गजभिये सौ सिमा गोरे सुनिता न्हावकर संध्या नाईक जया चव्हाण सुनंदा इंगळे दिपाली गोलाईत शितल तायडे उपस्थित होते.
0 Comments