बदली पोर्टल वर आक्षेप असा घ्यावा व त्याची मुदत याबाबत सविस्तर माहिती
*शिक्षक बदली प्रक्रिया 2022*
👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
➡️ *सार्वजनिक अपील कोणी कोणावर कशी करावी*
➡️ *किंवा कोणत्याही शिक्षकाची profile कशी पहावी*
✳️ *सार्वजनिक आक्षेप घेतांना*
➡️ *जबाबदार शिक्षकाने जबाबदारीचे भान ठेवून सार्वजनिक आक्षेप घ्यावा*
➡️ *कोणतेही शिक्षकांवर कोणीही कसाही आक्षेप घेऊ शकत नाही जोपर्यंत तुमच्याजवळ सबळ पुरावे असतील व ते तुम्हास सिद्ध करता येत असतील तरच आक्षेप घ्यावा अन्यथा घेऊ नये घेतल्यास आपण कारवाईस पात्र ठरू शकतो*
➡️ *सार्वजनिक आक्षेप हा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करायचा आहे*
➡️ *आक्षेप घेताना एका शिक्षकावर अनेक शिक्षक आक्षेप घेऊ शकतात परंतु एका शिक्षकावर अनेक वेळा आक्षेप घेऊ शकत नाही*
➡️ *उपसचिवांनी आक्षेप घेण्याच्या जाहीर केलेल्या तारखा खालील प्रमाणे*
**24/06/2022 ते 10/07/2022*
✳️ *पोर्टलवर सार्वजनिक आक्षेप कसा घ्यावा किंवा*
*इतर शिक्षकांची profile कशी पहावी*
➡️ *ज्या शिक्षकांचे profile शिक्षणाधिकारी यांच्याकडून except झाले आहे असेच शिक्षक इतर शिक्षकांची प्रोफाइल पाहू शकतात किंवा आक्षेप घेऊ शकतात*
➡️ *याकरिता खालील लिंक ला टच करा*
https://ott.mahardd.in/
➡️ *Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करा मेसेज मध्ये आलेला 6 अंकी OTP टाकून कॅपच्या टाका व लॉगिन करा*
➡️ *लॉग इन केल्यानंतर ओपन होणारे पेजवर स्क्रीनवरील डाव्या बाजूच्या कोपऱ्यातील तीन रेषांवर क्लिक करा*
➡️ *क्लिक केल्यानंतर directory या tab वर टच करा टच केल्यानंतर आपल्याला पाहिजे तो जिल्हा निवडा त्यानंतर जिल्ह्यातील पाहिजे तो तालुका निवडा*
➡️ *तालुका निवडल्याबरोबर आपल्यासमोर आपल्या तालुक्यातील ज्या शिक्षकांची profile शिक्षणाधिकारी यांच्याकडून except झाली आहे अशा शिक्षकांची नावे दिसतील*
➡️ *ज्या शिक्षकाची आपणास profile पहायची आहे किंवा आक्षेप घ्यायचा आहे अशा शिक्षकांच्या नावावर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या शिक्षकाची संपूर्ण profile आपल्यासमोर read only mode मध्ये दिसेल याचाच अर्थ आपण ती profile फक्त पाहू शकतो त्यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही*
➡️ *ज्या शिक्षकाची आपण profile पाहत आहात त्यांच्यावर जर आपल्याला आक्षेप घ्यायचा असेल तर profile च्या शेवटी checkbox असेल त्यामध्ये tik करून Comments box मध्ये त्या शिक्षकांच्या कोणत्या माहिती संदर्भात आक्षेप घ्यायचा आहे तो आक्षेप Comments box मध्ये नोंदवावा*
➡️ *त्यानंतर खालील social appeal या tab ला क्लिक केल्यानंतर मेसेज मध्ये आलेला 6 अंकी OTP प्रविष्ट करून सबमिट करावे त्यानंतर आपला आक्षेप मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठविला जाईल*
0 Comments