Subscribe Us

दिनांक १९/७/२०२२ शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय मुंबई येथे शालेय पोषण आहार विभागाचे अवर सचिव मान.प्रसाद पाटील साहेब यांची महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट

 



दिनांक १९/७/२०२२ शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय मुंबई येथे शालेय पोषण आहार विभागाचे अवर सचिव मान.प्रसाद पाटील साहेब यांची महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट 


दिनांक १९/७/२०२२ शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय मुंबई येथे शालेय पोषण आहार विभागाचे अवर सचिव मान.प्रसाद पाटील साहेब यांची महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन शालेय पोषण आहाराबाबत मुख्याध्यापकांना शाळा पातळीवर येणाऱ्या अडचणी बाबत चर्चा करण्यात आली त्यात प्रामुख्याने येऊ घातलेल्या आॅडिट संदर्भात चर्चा केली केंद्र शासनाचे निर्देश नुसार आॅडिट होणार आहे त्यात लवचिकते बाबत* *सकारात्मक भूमिका घेतली जाईल संघटनेने दरवर्षी लेखा परीक्षण होते आहे ही बाब निदर्शनास आणून दिली असता हे केंद्र शासनाने लेखा परीक्षण प्रस्तावित केले आहे तरी लेखा परिक्षण होणार नाही यासाठी सकारात्मक राहून पाठपुरावा करू असे अवर सचिव महोदयांनी सांगितले .

              त्याच प्रमाणे स्वयंपाकी मदतनीस यांचे मानधनात वाढ करण्यात यावी यासंदर्भात चर्चा करण्यात आली असता मानधनात 1000 पर्यंत अजून वाढ करण्यात येईल तसेच* *दैनंदिन शापोआ आॅनलाईन* *माहिती साठी महिना अखेर नंतर बॅक डेटेड माहिती भरण्यासाठी सुविधा द्यावी अशी मागणी केली असता सदर मागणी तत्वतः मान्य* 

*केली सदर चर्चेत महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री.सऺभाजीराव पाटील राज्य सरचिटणीस श्री.भाऊसाहेब निकम राज्य कोषाध्यक्ष श्री.औदूऺबर दराडे यांनी भाग घेतला*

*त्याच प्रमाणे लेखा वित्त विभागात सेवा निवृत्त मुख्याध्यापक व शिक्षक संवर्ग यांना सेवा निवृत्त होऊन दोन वर्षे होऊनही अद्याप गटविमा प्रा.फऺड व अऺशराशीकरण आदी रक्कम मिळाली नसल्याचे निदर्शनास आणून दिले त्यावर लवकरच प्रणाली चालू करण्यात येईल असे आश्वासन मिळाले*

   तसेच मंत्रालयात शालेय शिक्षण व क्रिडा मंत्रालयाचे उपसचिव मा.टी.वी करपते साहेब यांची भेट घेऊन मुख्याध्यापकांच्या विविध समस्या बाबत सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली या प्रसंगी उपस्थित महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघाचे राज्य अध्यक्ष श्री.सऺभाजीराव पाटील राज्य सरचिटणीस श्री.भाऊसाहेब निकम राज्य कोषाध्यक्ष श्री.औदूऺबर दराडे आदी उपस्थित होते

 ३४%डिए माहीती बघायला येथे क्लिक करा


शिक्षक बदली बाबत माहिती येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments