राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित , 15 वर्षे सेवा /वयाचे 50 वर्षे सेवा नियम लागु .दि.11.08.2022
राज्य शासन सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .कर्मचाऱ्यांना 15 वर्षे शासन सेवा / वयाच्या 50 वर्षे सेवा पुर्ण झाल्यानंतर काही सुट देणेसंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.11.08.2022 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे .याबाबतचा दि.11.08.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .
सामान्य प्रशान विभागाकडु दि.01.03.2018 रोजी निर्गमित झालेल्या निर्णयातील परिच्छेत क्र.02 वगळण्यात येवून पुढीलप्रमाणे बदल करण्यात आलेला आहे .यामध्ये पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट मिळण्याकरीता कर्मचाऱ्याची शासन सेवेतील 15 वर्षे पुर्ण झाल्याचा दिनांक किंवा वयाच्या 50 वर्षे पुर्ण झाल्याचा दिनांक यापैकी जे नंतर घडेल त्यानंतरच्या लगतच्या दिनांकास कर्मचाऱ्यास पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा सुट देण्याचा दिनांक असे समजण्यात येणार आहे .
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षेमध्ये सुट देण्यात आलेली आहे .यामुळे सदर निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी फायदा होणार आहे .याबाबतचा सामान्य प्रशासन विभागाचा दि.11.08.2022 रोजीचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्र. 202208111437238507 ) पुढीलप्रमाणे पाहु शकता .
0 Comments