Subscribe Us

खुशखबर :- अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 3% DA वाढ लागु करणेबाबत , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा , ऑगस्ट पासुन 34% दराने महागाई भत्ता लागु !

 

खुशखबर :- अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 3% DA वाढ लागु करणेबाबत , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा , ऑगस्ट पासुन 34% दराने महागाई भत्ता लागु !

राज्य शासन सेवेतील शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी व निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांची अखेर डी.ए वाढीबाबतची प्रदिर्घ कालावधीची प्रतिक्षा संपली आहे .कारण आज दि.16 .08.2022 रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 3 टक्के वाढीव महागाई भत्ता जाहीर करण्यात आलेला असुन , सदरचा वाढीव महागाई भत्ता जानेवारी 2022 पासुन लागु करण्यात येणार असल्याने जानेवारी पासुन डी.ए फरकाची रक्कम देखिल राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे . हा वाढीव 3 टक्के महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत रोखीने अदा करण्याची मोठी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांनी आज दि.16.08.2022 रोजी केली आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे .

 केंद्र सरकारने डी.ए वाढीची घोषणा केली असुन , केंद्रानंतर अनेक राज्यांनी डी.ए वाढीची घोषणा केल्याने , महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना देखिल वाढीव डी.ए वाढीची अधिकृत्त घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे .यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्के वरुन 34 टक्के झाला आहे .

अखेर राज्य कर्मचाऱ्यांना 3% DA वाढ लागु करणेबाबत , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा , ऑगस्ट पासुन 34% दराने महागाई भत्ता लागु झाल्याबाबत शासन निर्णय दोन दिवसात वेबसाईटवर देण्यात येईल..


Post a Comment

0 Comments