Subscribe Us

राज्य शासकीय व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 7 टक्के पगारवाढ होणार आहे

 

राज्य शासकीय व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 7 टक्के पगारवाढ होणार आहे

           राज्य शासकीय व इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 7 टक्के पगारवाढ होणार आहे .याबाबत राज्य शासनाचे अधिकृत्त शासन निर्णय दि.07.08.2022 रोजी निर्गमित झाले आहेत . याबाबतचा वित्त विभागाचा दि.17.08.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय खालीलप्रमाणे पाहुयात .


राज्यातील असुधारित वेतन संरचनेत वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहे जानेवारी 2022 पासुन 7 टक्के महागाई भत्ता वाढ लागु करण्यात आला आहे . सदरचा वाढीव महागाई भत्ता ऑगस्ट महिन्याच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .राज्यातील असुधारित ( सहाव्या वेतन आयोगानुसार ) वेतन धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 196 टक्के दराने महागाई भत्ता मिळतो .यामध्ये 07 टक्के वाढ जानेवारी 2022 पासुन लागु केल्याने , आता या राज्य कर्मचाऱ्यांना एकुण 203 टक्के दराने महागाई भत्ता लागु करण्यात येणार आहे .जानेवारी 2022 पासुन 7 टक्के महागाई भत्ता थकबाकी रोखीने ऑगस्ट महिन्याच्या देयकासोबत अदा करणेबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

        सदरचा वाढीव महागाई भत्ता थकबाकी सहाय्यक वेतन या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्याचे आदेश राज्य शासनाकडुन देण्यात आले आहे .याबाबतचा दि.17.08.2022 रोजीचा वित्त विभागाचा शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्रमांक – 202208171453304905 ) पुढीलप्रमाणे पाहू शकता .




Post a Comment

0 Comments