राज्यातील १२ जिल्ह्यांत नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical college)
मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांत वैद्यकीय महाविद्यालये नाहीत. त्यामुळे वैद्यकिय शिक्षण विभागासंदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये (Medical college) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून चार हजार कोटींचं कर्ज दिलं जात आहे. या कामांना लवकरच सुरुवात होईल. केंद्र सरकारकडूनही (central government) निधी लवकरच उपलब्ध करून दिला जाईल, असं आश्वासन राज्याचे नवनिर्वाचीत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी माध्यमांशी बोलताना दिलं आहे.
वैद्यकीय शिक्षण मंत्री महाजन माध्यमांशी बोलताना म्हणाले, आमची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. मागिल पाच वर्षात एकाही मेडीकल कॉलेजला परवानगी दिली नाही. परंतु, आता बैठकीत साहसी खेळाचा निर्णय घेतला. खासगीपेक्षा सरकारी मेडिकल कॉलेजचा नागरिकांना फायदा होईल.
जिल्ह्या जिल्ह्यात मेडिकल काॅलेज उभारल्यास नक्कीच त्याचा फायदा सर्व सामान्यांना होईल. महाराष्ट्रात गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलडाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत, असंही महाजन म्हणाले.
💖 शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢 स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली येथे क्लिक करा
💟महिला व बालकल्याण विभागात कर्मचारी भरती प्रक्रिया पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢 पुणे महापालिकेत मेघा भरतीसाठी सविस्तर माहिती येथे क्लिक करा
💦 प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना २०२२ सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
💥 बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचारी भरती बाबत सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा
💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ३ येथे क्लिक करा
💢 सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ४ येथे क्लिक करा
💢भारताविषयी संपूर्ण सामान्यज्ञान सराव प्रश्नावली भाग ५ क्लिक करा
💢सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली भाग ६ क्लिक करा

0 Comments