अंशदायी पेन्शन योजना रद्द करुन सर्वांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत , सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी कार्यक्रमाचे आयोजन.
राज्यातील सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागु करणेबाबत , राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र या संघटनामार्फत करण्यात आले आहेत .याबाबत राज्य संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा दि.21.08.2022 वार रविवार रोजी पार पडली . सदर सभेमध्ये राज्यातील सरकारी – निमसरकारी , शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना हक्काची जुनी परिभाषित पेन्शन योजना लागु करण्यात यावी , या मागणीबाबत चर्चा झाली .
राज्य शासनाकडुन 2005 नंतर राज्य शासन सेवेत रुजु झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागु करणेबाबत दि.19.01.2019 रोजी राज्य शासनाकडुन अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली आहे . समितीच्या दोन ते तीन बैठका संपन्न झालेल्या आहेत .परंतु सदर समितीमार्फत कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा नाराजगी दिसुन येत आहे .केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील सेनादलाला जुनी पेन्शन योजनाच कायम ठेवण्यात आलेली आहे . त्याचबरोबर खासदार , आमदार यांना जुनीच पेन्शन योजना कायम असल्याने , राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 1982 ची परिभाषित पेन्शन योजना कायम करावी यासाठी कर्मचाऱ्यांकडुन वारंवार मागणी करण्यात येते.
वारंवार मागणी करुन देखिल कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार होत नसल्याने , राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना , महाराष्ट्र या संघटनेमार्फत दि.21 सप्टेंबर 2022 रोजी राज्यव्यापी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहेत .याबाबत संघटनेचे अधिकृत्त पत्र खालीलप्रमाणे आहे .
💢NMMS सिलेक्शन यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥शिक्षक बदली बाबत अपडट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💢 शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
💥 आकारिक चाचणी बघण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments