BREAKING NEWS : राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता फरकासह,DA 34% बाबतचा शासन निर्णय लवकरच निर्गमित होणार .
राज्यातील शासकीय ,निवृत्तीवेतनधारक व इतर पात्र कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर जानेवारी 2022 पासुन 3 टक्के DA वाढ लागु करण्यात येणार आहे .यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी 2022 पासुन 34 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे .जानेवारी 2022 पासुन 3 टक्के डी.ए थकबाकीसह मिळणार आहे .यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे .
वित्त विभागाकडुन दिलेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना डी.ए वाढीबाबतचा निर्णय हा जुलै 2022 मध्ये निर्गमित होणे अपेक्षित होते . परंतु राज्यातील सत्तांतरामुळे कर्मचाऱ्यांचे प्रश्न प्रलंबित राहीले .नुकतेच केंद्र सरकारने जुलै 2022 पासुन 4 टक्के डी.ए वाढीची घोषणा केली असून ,सदरचा वाढीव डी.ए केंद्रीय कर्मचाऱ्यांना सप्टेंबर महिन्याच्या वेतन/पेन्शन देयकासोबत रोखीने मिळणार आहे . केंद्र सरकारने डी.ए वाढीची घोषणा केल्याने राज्य कर्मचाऱ्यांना देखिल डी.ए वाढीच्या निर्णयाची मोठी अपेक्षा राज्य शासनाकडुन आहे .राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागत नसल्याने , राज्य कर्मचारी येत्या 20 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी संप पुकारणार आहेत .
राज्य कर्मचारी राज्यव्यापी संप पुकारणार असल्याने , प्रशासन विस्कळीत होईल म्हणुन राज्य शासनाकडुन कर्मचाऱ्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात येणार असल्याने , राज्य कर्मचाऱ्यांना 20 ऑगस्ट पुर्वीच डी.ए वाढीबाबत गोड बातमी येईल .
0 Comments