Subscribe Us

अनधिकृत गैरहजर राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.29.08.2022


 


अनधिकृत गैरहजर  राज्य कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ! GR दि.29.08.2022


राज्य शासन सेवेतील अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करणेबाबत नियोजन विभागाने व विभागाच्या अधिनस्त कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांच्या रजेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय दि.29.08.2022 रोजी नियोजन विभागाकडुन निर्गमित झाला आहे . याबाबतचा नियोजन विभागाचा दि.29.08.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे पाहुयात .


राज्य शासनाच्या असे निदर्शनास आले आहे कि , अधिकारी / कर्मचारी हे रजा मंजुर करुन अथवा रजा मंजूर न करताच दिर्घकाळीन रजेवर जातात . रजेवर जाताना कार्यासन प्रमुख / आस्थापना प्रमुखांना लेखी अथवा दुरध्वनीद्वारे अवगत करत नाहीत .बहुतांश वेळा रजा शिल्लक नसल्याने त्यांची असाधारण रजा होते . अशा असाधारण रजेची वसूली कर्मचाऱ्यांच्या पुढील महिन्यांच्या वेतन देयकातुन करण्यात येते . परंतु राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचे सदस्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेत जमा होणाऱ्या 10 टक्के व 14 टक्के निवृत्तीवेतन अंशदानाच्या रकमेची वसूली करता येत नाही .कारण एनपीएस कर्मचाऱ्यांना एनपीएस खात्यावर योगदानाची रक्कम जमा केल्यानंतर सदरची रक्कम परत घेता येत नाहीयामुळे अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात आले आहे कि , दिर्घकालीन रजेवर जाण्यापुर्वी रजा खाती पुरेशी रजा उपलब्ध आहे याची खात्री करुन , रजा मंजुर केल्यानंतरच रजेवर जावे . वारंवार गैरहजर किंवा अनधिकृतपणे गैरहजर राहणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत .याबाबतचा नियोजन विभागाचा दि.29.08.2022 रोजीचा सविस्तर शासन निर्णय ( शासन निर्णय सांकेतांक क्र. 202208291611085216 ) येथे क्लिक करुन डाउनलोड करा 

ब‌दली बाबत आदेश वाचण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments