Subscribe Us

वर्ग तिसरी ते आठवी परीक्षा पुन्हा सुरू होणार शिक्षणमंत्री दीपक केसरकर

 



वर्ग तिसरी ते आठवी परीक्षा पुन्हा सुरू होणार शिक्षणमंत्री दीपक केसरकर

संपूर्ण महाराष्ट्र राज्यात शिक्षणाचा अधिनियम 2009 ‘आरटीई’ कायदा लागू झाल्यापासून पुर्वीची परिक्षा पध्दत बंद करून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे अकारिक व संकलित सातत्यपूर्ण सर्वंकष पद्धतीने मूल्यमापन केले जात आहे. दहा वर्षांपासून बंद असलेल्या तिसरी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुर्वी प्रमाणे घेण्याची घोषणा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत केली. जिल्हा दौर्‍यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी याबाबत संवाद साधला.

              शालेय शिक्षण मंत्री केसरकर म्हणाले,शहरी असो कि ग्रामीण भागात शिक्षण दर्जेदार व्हावेत, यासाठी सरकार काम करीत आहे. शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र देशात 9 व्या क्रमांकावर आहे. पहिल्या तीन क्रमांकामध्ये आणण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण चांगल्या पद्धतीने राबविण्याचा विचार आहे. एकशिक्षकी व शून्य शिक्षकी शाळांचे एकत्रीकरण केले जाणार आहे. शिक्षकांचे अनेक संघटना आपल्या समस्या मांडत आहे, अधिवेशनापूर्वी शिक्षकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविले जातील व त्यासाठी आर्थिक तरतूद केली जाईल.

                कमी पटसंख्या बंद करण्याचे सरकारचे धोरण नसल्याचे सांगून मंत्री केसरकर म्हणाले, एकाच शिक्षकाने विषय शिकविण्यावर मर्यादा येतात. वेगवेगळ्या शिक्षकांना चांगल्या शाळा देऊ शकतो. यासाठी धोरण निश्चित करण्याचे काम सुरू आहे. मुलांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी नमुन्याचे पुस्तके तयार केली आहेत. पुस्तकात वही असणार आहे. सर्वच विषय पुस्तकात असले तरी वजन कमी असणार आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास महत्त्वाचा आहे

तसेच केसरकर म्हणाले, गृहपाठ बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ नये म्हणून सर्व निर्णय तज्ज्ञांना विचारूनच घेतले जातील

             3 ते 5 वयोगटातील ज्यु. केजी, सीनिअर केजीला गृहपाठ दिले जातात, हे त्यांचे खेळण्याचे वय असते. इतर देशात लहान मुलांच्या डोक्याला ताण दिला जात नाही. आठवीपर्यंत मुलांना परीक्षा नसल्याने अभ्यासात मागे पडत आहेत. इंग्रजी, सायन्स, गणितात विद्यार्थी कमी पडत आहेत. याबद्दल आवड निर्माण केली जाणार आहे. यासाठी प्रयोग केले जात आहे. दुर्गम भागातील जेथे वाहन जात नाही, अशा शाळांची माहिती घेतली जाईल. सर्वांना शिक्षण मिळणे त्यांचा हक्क आहे, यासाठी सरकार कटिबद्ध आहे. शिक्षकांचा दर्जा चांगला आहे. प्राथमिक शाळांमधील शिक्षणात राज्य अग्रेसर आहे. माध्यमिकमध्ये कमी पडत आहोत. प्राथमिक शिक्षणाचा पाया सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. चांगले शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे, असेही ना. केसरकर यांनी स्पष्ट केले.


15 हजार शिक्षकांची पदे तत्काळ भरणार


मागिल काही वर्षांत शिक्षक, शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. लवकरच 75 हजार पदांची भरती एका दिवसात करावी, अशी चर्चा मंत्रिमंडळात झाली आहे. लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे.

1 कोटी लोकांची परीक्षा घेणार्‍या संस्थांची यासाठी मदत घेतली जाणार आहे.

30 हजार पदे रिक्त आहेत. 15 हजार शिक्षकांची पदे तत्काळ भरली जाणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.



Post a Comment

0 Comments