Subscribe Us

निवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन याविषयी तात्काळ निर्णय घेणार ! मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे.

 


निवृत्तीचे वय 60 वर्षे व जुनी पेन्शन याविषयी तात्काळ निर्णय घेणार ! मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे.


                 मुंबई येथे महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने 27 सप्टेंबर 2022 रोजी लक्षवेधी दिन आंदोलन करुन सरकारचे लक्ष्य वेधाण्यात येणार होते .यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी सह्याद्री अतिथीगृह येथे बैठकीसाठी पाचारण करण्यात आले होते . सदर कर्मचारी बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडुन विविध 17 मागण्या मुख्यमंत्र्यासमोर मांडल्या .बैठकीमध्ये नमुद करण्यात आलेल्या मागण्या व बैठकीचे इतिवृत्त बाबत संघटनेच्या वतीने प्रसिद्धीप्रत्रक दि.19.09.2022 रोजी जाहीर करण्यात आले आहेत .याबाबतचे सविस्तर प्रसिद्धीपत्रक पुढीलप्रमाणे पाहुयात .

      जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत अनेक प्रकारचे आंदोलन कर्मचारी वर्गातून होत आहे व काही राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे.याचा सकारात्मक विचार करून हे सरकार आपल्या पाठीशी आहे असे सकारात्मक सुचक वक्तव्य मुख्यमंत्री यांनी केले व जुनी पेन्शन लागू होण्याची आशा पल्लवित झाली आहे 

                मुंबई येथील झालेल्या बैठकीमध्ये संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेतनत्रुटी , जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करण्यात यावे. कर्मचारी यांच्या विविध खात्यातील बढती प्रक्रिया विनाविलंब करण्यात यावी .सातव्या वेतन आयोगातील वाहतुक भत्तासह इतर सर्व देय भत्ते लागु करण्यात यावे .सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांसाठी वाहन खरेदी अग्रिमाच्या कमा मर्यादेत वाढ करण्यात यावी .सातव्या वेतन आयोग थकबाकीच्या चौथ्या हप्त्याचे लवकर प्रदान करण्यात यावे .शासकीय सेवेत कार्यरत पती -पत्नी एकत्रित ठेवण्याच्या धोरणानुसार महसूल विभाग वाटप नियम 2021 च्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात यावी .सेवानिवृत्ती उपदान / मृत्यू उपदान केंद्राप्रमाणे 20 लाख रुपये करण्यात यावे .अशा विविध 17 मागण्यावर मुख्यमंत्री समवेत सखोल चर्चा करण्यात आली .


                 आज संघटनेने केलेल्या मागण्याबाबत तात्काळ सकारात्मक निर्णय घेवू अशी ग्वाही मुख्यमंत्री ना .एकनाथ शिंदे यांनी दिली आहे .तसेच या बैठकीअंती महासंघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला लक्षवेधी दिन आंदोलनास स्थगिती देण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे .या संदर्भातील महासंघाचे प्रसिद्धीपत्रक देणार आहे .

💢शिक्षक बदली बाबत अपडेट बघण्यासाठी येथे क्लिक करा

💟💢आदर्श परिपाठ नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments