🔯 *श्री जेष्ठगौरी (महालक्ष्मी) स्थापना मुहूर्त* 🔯
श्री महालक्ष्मी व्रत हे नक्षत्र प्रधान आहे. ते भाद्रपद शुक्लपक्षात अनुराधा, जेष्ठा मूळ नक्षत्रावर केले जाते.
या वर्षी भाद्रपद महिन्यात शुक्लपक्षात सप्तमी , शनिवार दि.०३/०९/२०२१ ला अनुराधा नक्षत्राचा योग असल्याने आपल्या कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मीचे आवाहन करावे.
महालक्ष्मी बसवाव्यात.
या दिवशी भद्रा वा वैधृती योग असला तरी स्थापनेला त्याचा निषेध नाही.
कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मीचे आवाहन करावे. महालक्ष्मी बसवाव्यात.
🔯 *श्री जेष्ठगौरी (महालक्ष्मी) पूजन मुहूर्त* 🔯
भाद्रपद शुक्ल अष्टमी , रविवार दि.०४/०९/२०२१ ला ज्येष्ठा नक्षत्र दिवसभर आहे. महालक्ष्मीचे पूजन व महानैवेद्य आपल्या कुलाचाराप्रमाणे दुपारी किंवा सायंकाळी करावा. या वर्षी महालक्ष्मी पुजनास योग श्रेष्ठ आहे.
🔯 *श्री जेष्ठगौरी (महालक्ष्मी) विसर्जन मुहूर्त* 🔯
भाद्रपद शुक्ल नवमी , सोमवार दि.०५/०९/२०२१ ला नवमी सह दशमी सोमवारी मूळ नक्षत्रावर रात्री ०८:०५ पर्यंत आपले कुळाचाराप्रमाणे सकाळी किंवा सायंकाळी महालक्ष्मीचे विसर्जन करावे.
मूळ नक्षत्रावर कुलाचाराप्रमाणे महालक्ष्मीचे विसर्जन करावे.
या वर्षी महालक्ष्मीचे वाहन रेडा असून ती दही भक्षण करीत आहे. तिने काळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. अंकुश शस्त्र हातात घेतले असून तिने रक्ताचा तिलक लावला आहे. ती ईशान्य दिशेकडे पाहत आहे. या महालक्ष्मीचे फल राज्यास त्रासदायक आहे.
(वरील सर्व माहिती ही वैदर्भ पचांग अकोला महाराष्ट्र मधून जशीच्या तशी टाईप दत्ता काटे गुरुजींनी केली आहे.)
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
(श्री दत्ता काटे गुरुजी) www.Facebook.Com/Datta Kate (Guruji)
Facebook वरून आपण रोजचे पंचाग, राशिभविष्य व तोडगे व तिथी तसेच धार्मिक , तसेच जुने पंचाग माहिती पाहू शकता.
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
(श्री दत्ता काटे गुरुजी,ज्योतिष शास्त्र विशारद,हस्तरेषा तज्ञ, वास्तु शास्त्र, आध्यात्मिक तोडगे अभ्यासक, अकोला (महा.)
(कृपया वरील तोडगा व माहिती नावासह व नाव न बदलता शेअर करावे.या लहानश्या कृतीने तात्त्विक आनंद व नैतिक समाधान मिळते.)
🙏 *ॐ द्राम श्री स्वामी समर्थ द्राम ॐ*🙏
🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
*(कृपया पूर्ण वाचा व शेअर करा)*
🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉🕉
🔳 *भाद्रपदातील जेष्ठागौरी : धर्म-*
*शास्त्र नियम* 🔳
◾ *"पुत्रदारविवृध्दयर्थ लक्ष्म्याश्चापि विवृध्दये |*
*अलक्ष्म्याश्च विनाशाय सर्वकालं भजेत ताम् ||"*
*ह्यावरुन जेष्ठागौरीदेवीचे प्रमुख कार्य "अलक्ष्मीचे नि:सारण करणे" असे दिसून येते. बहुतेक कुटुंबांत उपजीविकेसाठी होणाऱ्या अर्थव्यवहारातून कळत-नकळत अलक्ष्मीचा (काळा पैसा हे अलक्ष्मीचेच एक रुप आहे) प्रवेश होत असतो. अलक्ष्मीचा प्रादुर्भाव जितका अधिक तितक्या अधिक प्रमाणात विविध भौतिक, शारीरिक, सामाजिक आपत्तींनी ते कुटुंब ग्रस्त होते. ह्याच कारणास्तव अलक्ष्मी-नि:सारणार्थ विहित असणाऱ्या विविध व्रतांमध्ये जेष्ठागौरीदेवीच्या व्रताचा प्राधान्याने अंतर्भाव होतो. उपरोक्त अलक्ष्मीस वाव देण्याच्या दुष्प्रवृत्तीस ह्या जेष्ठागौरीदेवीच्या कृपेमुळेच आळा बसण्यास साहाय्य होते.*
1⃣ *भाद्रपद शुक्ल पक्षात 'जेष्ठा नक्षत्र' 'मध्यान्हकाली' असलेल्या दिवशी जेष्ठागौरी पूजन आपापल्या प्रथेप्रमाणे सकाळी/दुपारी/सायंकाळी करावे. ह्यासाठी 'नक्षत्र वेळेची मर्यादा नाही.' त्यामुळे पूजनाचे वेळी जेष्ठा नक्षत्र संपून 'मूळ नक्षत्र' असतां हरकत नाही. प्रथम पूजनाचा दिवस निश्चित करुन तद्नुरोधाने 'आदल्या' दिवशी 'आवाहन' व 'दुसऱ्या' दिवशी 'विसर्जन' ह्याप्रमाणे असते. हे व्रत 'नक्षत्र प्रधान' असल्याने तिथीशी ह्याचा काही संबंध नाही.*
2⃣ *◾गौरी 'आवाहन' 'अनुराधा' नक्षत्र असतांना करावे. आवाहनाचे दिवशी बहुधा "वैधृति योग (अनिष्ट योग) असतो. तो असला तरी त्याचा विचार करण्याची आवश्यकता नाही.*
◾ *गौरी 'विसर्जन' 'मूळ' नक्षत्र असताना करावे. 'आवाहन' व 'विसर्जन' दोन्हींना 'नक्षत्र वेळेची मर्यादा आहे.' ह्यासाठी धर्मशास्त्राचे नियम पाहून "दाते पंचागात" 'आवाहन' व 'विसर्जना'ची 'वेळ' (मर्यादा) दिलेली असते.*
3⃣ *जेष्ठागौरी काहीजणांकडे उभ्या असतात, त्या तांब्यावर, सुगडावर किंवा खड्यांच्या असतात. आपला जसा कुलाचार असेल तशा प्रकारे गौरीपूजन करावे.*
4⃣ *गौरीपूजन महत्वाचे असल्याने, गौरीपूजनाचे दिवशी अशौच (सोहेर, सुतक) संपत असेल तर गौरी आवाहन दुसऱ्याकडून करवून घ्यावे. पूजन-विसर्जन स्वत:स करता येईल.*
5⃣ *गौरी आवाहन केल्यानंतर अशौच आले, तर पूजन-विसर्जन दुसऱ्याकडून करवून घ्यावे. मात्र पूजेचे सर्व साहित्य पूजा करणार्या व्यक्तीने स्वत:चे घरातील आणावे. अशुचि घरातील साहित्य वापरु नये.*
6⃣ *गौरी विसर्जन 'मूळ' नक्षत्रावर करावयाचे असल्याने कोणताही वार वर्ज्य नाही. काही ठिकाणी मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी गौरी विसर्जन करीत नाहीत. मात्र ह्याला कोणताही शास्त्राधार नाही.*
7⃣ *गौरीपुढे नैवेद्य दाखवून दिवसभर ताट तसेच ठेवून दुसरे दिवशी प्रसाद घेणे योग्य वाटत नाही. कारण कोणत्याही देवतेला नेवैद्य समर्पण केल्याबरोबर त्या देवतेने तो नैवेद्य स्वीकारलेलाच असतो आणि त्यानंतर लगेच प्रसाद म्हणून तो आपण घेऊ शकतो.*
8⃣ *घरातील एखादी व्यक्ती विशेषत: आई किंवा वडील मृत झाल्यावर एक वर्षाचे आंत (नेहमीप्रमाणे) कुलाचाराप्रमाणे गौरीपूजन करावे. काही ठिकाणी अशा वेळेस गौरी उभ्या न करता पाटावर, सुगडावर बसविण्यास सांगितले जाते, ह्यास कोणताही शास्त्राधार नाही. केवळ भावनेपोटी आणि गैरसमजुतीमुळे असे सांगितले जाते. अशा वेळेस उभ्या गौरींचे पूजन नेहमीप्रमाणे करावे.*
9⃣ *नव्याने गौरीपूजन सुरु करण्यासाठी कोणी नातेवाईकांनी मुखवटे किंवा हात किंवा गौरी द्यावा लागतात, हा गैरसमज आहे. ती व्यक्ती स्वत: बाजारातून आणू शकते. नव्याने गौरीपूजन स्वेच्छेने केव्हाही सुरु करता येते. तसेच लक्ष्मीचे दोरे सापडले तर घरी गौरीपूजन सुरु करता येते असे नाही. स्वेच्छेने केव्हाही गौरीपूजन सुरु करता येते.*
🔟 *गौरी विसर्जनाची मर्यादा काही वेळेस सकाळी लवकर असते, अशा वेळेस मंत्रांनी जागेवर गौरी विसर्जन करुन घ्यावे आणि नंतर संध्याकाळी प्रथेप्रमाणे आवरुन ठेवावे किंवा जलाशयात विसर्जन करावे.*
*🌹|| श्री.स्वामी समर्थ ||🌹*
0 Comments