Subscribe Us

मा.मुख्यमंत्री यांनी दिले शिक्षक बदली बाबत विशेष माहिती

 





 मा.मुख्यमंत्री यांनी दिले शिक्षक बदली बाबत विशेष माहिती


*विषय क्र.०१ - जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली बाबत.*

              या विषयी आंतरजिल्हा बदलीचे सुधारित धोरण शासन निर्णय क्र.जिपब-४८२०/प्र.क्र.२९१/आस्था-१४ दि.०७/०४/२०२१ अनुसार व जिल्हांतर्गत बदलीचे सुधारित धोरण शासन निर्णय क्र.जिपब-४८२०/प्र.क्र.२९०/आस्था-१४ दि.०७/०४/२०२१ अनुसार ठरविण्यात आलेले असून नुकतेच ग्रामविकास विभागाने ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या केलेल्या आहेत. या विषयी खालील मुद्द्यांवर तात्काळ कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे.


1-आंतरजिल्हा बदली धोरणात बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्यासाठी ते कार्यरत असलेल्या जिल्ह्यात १० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त नसण्याची अट घातल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये बदली होवूनही शिक्षकांना कार्यमुक्त केले जात नाही. ही अट रद्द करून आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात यावे व जिल्हांतर्गत बदली धोरणातील समानीकरण व नवीन शिक्षक भरती द्वारे तसेच शिक्षक भरती पर्यंत जि.प./पं.स./शाळा व्यवस्थापन समिती ला स्थानिक पातळीवर शिक्षकांची पर्यायी व्यवस्था करण्याचे अधिकार देवून रिक्त पदांची समस्या सोडविण्यात यावी ही विनंती.


2-नुकतेच पार पडलेल्या आंतरजिल्हा बदलीच्या टप्प्यात अनेक जिल्ह्यांमध्ये उर्दू माध्यमाचे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती इत्यादी मागासवर्गीय जातींच्या अनेक जागा रिक्त असूनही ह्या जातींचे आंतरजिल्हा बदली इच्छुक 

शिक्षक उपलब्ध नसल्याने ह्या जागा रिक्तच राहिलेल्या आहेत. ज्या प्रमाणे उर्दू माध्यम शिक्षक भरतीच्या वेळी अनुसूचित जाती च्या सर्व रिक्त जागांवर तसेच अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग चे उमेदवार भरतीच्या वेळी उपलब्ध नसल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांवर फक्त उर्दू माध्यमासाठी शासन निर्णय,शालेय शिक्षण विभाग क्र.एसएसएन १०००/(३६१/२००१)/माशि-२ दि.०७/१२/२००१ नुसार ह्या जागा खुल्या प्रवर्गातून भरल्या जातात त्याच प्रमाणे या शासन निर्णयानुसार व ग्रामविकास विभागाचे पत्र क्र. जिपब-२०२२/प्र.क्र.२९/आस्था-१४ दि.१० जून, २०२२ अनुसार आंतरजिल्हा बदलीच्या वेळीही उपरोक्त जातींचे आंतरजिल्हा बदली इच्छुक शिक्षक उपलब्ध नसल्यास ह्या रिक्त जागांवर खुला प्रवर्गातील शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची संधी द्यावी व यासाठी फक्त उर्दू माध्यमासाठी आंतरजिल्हा बदलीचा विशेष टप्पा घेण्यात यावा ही विनंती.

3-पदावनत न करता विषय शिक्षक इत्यादी ज्या पदावर शिक्षक काम करतो त्याच पदावर आंतरजिल्हा बदली करणे सुद्धा शक्य आहे म्हणून ज्या पदावर शिक्षक कार्यरत आहे, नवीन जिल्ह्यात त्याच पदावर व वेतनश्रेणी वर पदस्थापना देण्यात यावी ही विनंती.

आंतरजिल्हा बदली मध्ये 

4-ज्या ठिकाणी जागा रिक्त नसल्याने पदावनत होणे आवश्यक असल्यास अशा ठिकाणी जेंव्हा शिक्षकांनी आज पर्यंत त्या पदावर काम केलेले आहे तेंव्हा त्या काळातील वसूली करणे हा मोठा अन्याय आहे म्हणून पदावनत झालेल्या अशा शिक्षकांकडून कोणत्याही प्रकारची वसूली करू नये ही विनंती.


5-सन २०१९ मधील बदली प्रक्रिया ३१ मे नंतर पूर्ण करण्यात आली होती व या प्रक्रियेतील काही शिक्षक जुलै मध्ये ही रुजू झाले होते तसेच या वर्षी आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया काही तांत्रिक कारणांमुळे खूप उशिरा होत असल्याने फक्त या वर्षी होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दि.३० जून २०२२ पर्यंत आपण वाढविलेली आहे, ती ३१ जुलै २०२२ पर्यंत वाढविण्यात यावी ही विनंती.


6-आंतरजिल्हा व जिल्हांतर्गत ह्या दोन्ही धोरणांत जि.प.माध्यमिक, न.प./मनपा/बीएमसी तसेच खाजगी शाळांमधील शिक्षकांनाही सामील करून घेण्याबाबत संबंधित विभागाकडे शिफारस करावी ही विनंती. (संबंधित इतर विभाग- ग्रामविकास विभाग)

💢शिक्षक बदली बाबत शिक्षणाधिकारी यांचे आदेश येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments