मुख्यालयी home allowance राहण्याची अट रद्द करणार मा. ना. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचे आश्वासन
आज मुंबई येथे " नंदनवन " या मुख्यमंत्री साहेबांच्या निवास स्थानी शिक्षक संघाचे नेते मा. माधवराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले त्यावेळी चर्चा करताना राज्यसंघाचे अध्यक्ष केशवराव जाधव व राजाराम वरुटे यांनी शिक्षक आपल्या निवासस्थानापासून २५ ते ३० मिनिटा मध्ये आपल्या कामाच्या ठिकाणी सहज पोहोचू शकतो . तेंव्हा शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट कायमची रद्द करावी. अशी विनंती केली.
शिक्षक मुख्यालाय याबाबत सद्या खूप चर्चा सुरु आहे. शिक्षक संघटना यावर खूप आक्रमक झाल्या आहे . प्रत्येक संघटना विविधं स्तरावर प्रयत्न करीत आहे.
शालेय गुणवत्ता महत्वाची बाब आहे. ती पूर्ण होत असेल तर बाकी गौण आहे.त्यामुळे मुख्यालय हि बाब महत्वाची नाही.
आज संपूर्ण संघटनेच्या सभासद यांच्याशी सविस्तर चर्चा केली , त्यावेळी त्यानी मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणेचा निर्णय लवकरच घेवू असे राज्याचे मुख्यमंत्री मा.ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितले. याच बरोबर खालील मुद्द्यावर चर्चा करून लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
१) जुनी पेन्शन त्वरीत लागू करावी.
२) शिक्षकांच्या रिक्त जागा लवकरात लवकर भराव्यात .
३) ७ व्या वेतन आयोगाचा खड २ लवकर प्रसिद्ध करून वेतन त्रुटी दूर कराव्यात.
४) MS-CIT प्रशिक्षणाची मुदत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवून मिळावी.
आदी प्रश्नावर सविस्तर चर्चा करुन निवेदन देण्यात आले
शिष्टमंडळा मध्ये सल्लागार वसंतराव हारुगडे, ठाणे जिल्हा संघाचे अध्यक्ष भगवान भगत, सरचिटणीस विजय पडवळ, आदी उपस्थित होते.
💢शिक्षक बदली बाबत सविस्तर माहिती येथे क्लिक करा
💢दिवाळीपूर्वी ४ % महागाई भत्ता सविस्तर माहिती येथेक्लिक करा
0 Comments