भेटीचा ओलावा शब्दांत कुठे असतो....Dasera Festival आपणास दसऱ्याच्या विशेष शुभेच्छा.....
भेटीचा ओलावा शब्दांत कुठे असतो...
पण शब्दाला भावना असते...
शब्दांना गंध असतो....
प्रेमळ निस्वार्थ शब्द हे मनात घर करून राहतात...
माझ्या भावना नक्कीच आपल्या पर्यंत पोहोचतील व आपल्याला विजयादशमीच्या आनंदात क्षणभर का असेना भेटीचा आस्वाद देतीलच.....
आनंदाचा क्षण म्हणजे दसरा...
विजयाचा क्षण म्हणजे दसरा....
प्रेम भाव निर्माण होणं म्हणजे दसरा...
भेटीचा गोडवा वाढविणारा क्षण म्हणजे दसरा.....
नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा विजय म्हणजे दसरा...
द्वेष भावना नष्ट करून प्रेमभाव निर्माण करणारा सण म्हणजे दसरा...
कर्माला सत्कर्माची जोड देऊन संस्कृती जपणारा सण म्हणजे दसरा...
अज्ञाणाला ज्ञाणाची वाट दाखवून संस्कार रूजवणारा सण म्हणजे दसरा.....
दोन जिवांना अलगद मिठी मारून एक करणारा सण म्हणजे दसरा....
आपट्याच्या पानाला सोन समजून घट्ट जिव्हाळा निर्माण करणारा सण म्हणजे दसरा....
प्रियकराची आठवण करून देणारा सण म्हणजे दसरा....
नात्यांची बंधन नव्याने उजळून टाकणारा सण म्हणजे दसरा....
भेटीची आस लावणारा सण म्हणजे दसरा.....
खरच आपण सोनं वाटतो का पण भावनांना सोन्याचा लेप देऊन नात्यांना जपणारा सण म्हणजे दसरा..
विश्वास, प्रेम, आपुलकी, सकारात्मकता, अशा शब्दरूपी शस्त्रांची पुजा करणारा क्षण म्हणजे दसरा....
भेट नाही पण आठवण आहे..
आजही त्या बोलक्या नजरेतील भाव हृदयात आहे..
आजही प्रत्येक क्षणाची गुंफलेली सुगंधी फुलांची माळ मनात आहे..
आजही सहवासात घालवलेल्या प्रत्येक दिवसाची ज्योत पेटती आहे..
आजही चेहऱ्यावरील प्रसन्नमय स्मित हास्याची चाहुल लक्षात आहे...
अशा प्रत्येक क्षणाची दिवसांची आठवण करून देणारा सण म्हणजे दसरा...
फुलांच्या माळेप्रमाणे तुमच्या आयुष्यात सदैव सुख समृद्धी नेहमी एकत्र राहो..
तुमच्या आयुष्यात सोन नव्हे तर सदैव प्रत्येक दिवस सोन्याचा राहो..
सोनरूपी आपट्यांची पाने घेऊन जरी आज मी तुम्हाला भेटायला येत नाही तरी माझ्या शब्दांना आपण सोनरूपी आपटे समजून निर्मळ शब्दांच आलिंगन घेऊन माझ्या दसऱ्याच्या शुभेच्छा स्विकाराव्या.....
सोनेरी सुर्यांची किरणे सदैव तुम्हाला सकारात्मक विचारांची शक्ती देवो या सदिच्छा सह आपण नक्कीच भेटू हा विश्वास बाळगून सकारात्मक विचारांचा दसरा नियमितपणे साजरा करूया....
विजयादशमी, ज्याला दसरा, किंवा दशैन असेही म्हणतात, हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जातो. हे हिंदू कॅलेंडरमधील अश्विन महिन्यातील दहाव्या दिवशी पाळले जाते, हिंदू लुनी-सौर कॅलेंडरचा सातवा महिना, जो विशेषत: सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांत येतो.
विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील विविध भागात वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये, विजयादशमी ही दुर्गा पूजेची समाप्ती म्हणून चिन्हांकित करते, देवी दुर्गाने म्हशीच्या राक्षसावर महिषासुरावर धर्माची पुनर्स्थापना आणि संरक्षण करण्यासाठी केलेल्या विजयाचे स्मरण होते. उत्तरेकडील, मध्य आणि पश्चिमेकडील राज्यांमध्ये, या सणाला दसरा म्हणतात (याला दसरा, दशहरा देखील म्हणतात). या प्रदेशांमध्ये, ते रामलीलाच्या समाप्तीचे चिन्हांकित करते आणि देव रामाने रावणावरील विजयाची आठवण करते. वैकल्पिकरित्या, हे दुर्गा किंवा सरस्वती या देवी देवीच्या पैलूंपैकी एकासाठी आदर दर्शवते.
❤️आंब्याची तोरणे लावूनी दारी येवो तुमच्या आयुष्यात सोन्याची झळाळी,
पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा,
विजयादशमीच्या तुम्हाला व
तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा❤️😊
❤️😊दसरा….या दिवशी म्हणे सोन वाटतात…
एवढा मी श्रीमंत नाही…
पण नशीबानं जी सोन्यासारखी
माणसं मला मिळाली…
त्यांची आठवण म्हणुन हा प्रयत्न…
सोन्या सारखे तर तुम्ही आहातच…
सदैव असेच राहा…
❤️😊 सोनेरी दिवस, सोनेरी पर्व,
सोनेसी क्षण, सोनेरी आठवणी,
सोन्यासारख्या लोकांना
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा..😊❤️
❤️😊वाईटाचा नाश होऊन तुमच्या जीवनात
भरभरून आनंद येवो हीच दसऱ्याच्या
दिवशी राम चरणी प्रार्थना
विजयादशमीच्या तुम्हाला व तुमच्या
संपूर्ण परिवाराला हार्दिक शुभेच्छा😊❤️
आपलाच
अनिल चव्हाण
राज्य पुरस्कृत मुख्याध्यापक
आदर्श जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी या मोताळा जिल्हा बुलढाणा
9767866933
0 Comments