Subscribe Us

PLI : सर्व कर्मचारी व व्यावसायिक यांच्यासाठी भारतीय डाक विभागाची अत्यंत लाभदायक गुंतवणुक ( with insurance ) योजना !

 


PLI : सर्व कर्मचारी व व्यावसायिक यांच्यासाठी भारतीय डाक विभागाची अत्यंत लाभदायक गुंतवणुक ( with insurance ) योजना !



भारतीय डाक विभागाने सर्व कर्मचारी व व्यावसायिक यांच्यासाठी अत्यंत लाभदायक योजना ( PLI ) सुरु केली आहे .या योजनेमध्ये गुतवणुक करणाऱ्यांना इतर कंपनींच्या तुलनेत अधिक रिटर्न व विमा संरक्षण देखिल मिळतो .या योजनेचे नाव भारतीय डाक विमा ( POST LIFE INSURANCE ) असे आहे . या योजनेचे अनेक लाभदायक वैशिष्ट्ये असल्याने , या योजनेत गुंतवणुक करणाऱ्यांची संख्या वाढत आहे .या योजनेची खास वैशिष्ट्ये ,पात्रता या विषयी सविस्तर माहीती पुढीलप्रमाणे पाहुयात .


पात्रता – ही योजना खास शासकीय व निमशासकीय कर्मचारी ,कंत्राटी कर्मचारी ,महामंडळे , सर्व शैक्षणिक संस्था , सर्व बँका आणि सहकारी सोसायटीचे कर्मचाारी तसेच N.S.C किंवा BSC LISTED कंपन्याचे कर्मचारी सर्व प्रोफेशनल डिग्री होल्डर सर्व डॉक्टर , इंजिनिअर ,आर्किटेक्टर ,ॲडव्होकेट,चार्टर्ड अकांऊटन्ट इत्यादी या योजनेचा लाभ घेवू शकतील .शिवाय या योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांचे वय किमान वय 19 वर्षे तर कमाल वय 55 वर्षे असणे आवश्यक आहे .या योजनेत गुंतवणुक प्रिमियमची रक्कम ही कर्मचाऱ्यांच्या वयानूसार आधारीत असणार आहे .


या योजनेची खास वैशिष्ट्ये –


या योजना अंतर्गत सर्वात कमी प्रिमियम असून सर्वात जास्त बोनसची व्यवस्था करण्यात आली आहे .शिवाय या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना पासबुकची सुवधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे .त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीने हप्ता भरण्याची सुविधा जसे ऑनलाईन बँकिंग , डेबिट कार्ड , फोन पे / PAYTM च्या माध्यमातुन पेमेंट करु शकता .या योजनेमध्ये कर्ज / गहाणखत / नामनिर्देशन सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .यामध्ये विमा नैसर्गिक त्याचबरोबर अपघाती मृत्युसाठी विमा संरक्षण उपलब्ध करुन देण्यात आली आहे .विमाची मर्यादा हि 20,000 रुपये ते कमाल 50 लाख रुपये पर्यंत आहे .सदर रक्कम आयकर कायदा 80 सी अंतर्गत प्राप्तिकर सवलतीस प्राप्त आहे .


आपल्या वयानुसार पॉलिसी हप्ता व मुदतअंती मिळणारी एकुण रक्कमबाबचा सविस्तर चार्ट पुढीलप्रमाणे पाहु शकता .


लाभ कसा घ्याल –


या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या जवळच्या डाक कार्यालयास भेट द्यावी .या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली कागतपत्रे लागतील .


आधारकार्ड

पॅनकार्ड

आयकार्ड / नियुक्ती पत्र ( नोकरीचे )

पासपोर्ट साईज फोटो

💢PLI चार्ट येथे बघा व डाउनलोड करा


Post a Comment

0 Comments