सुधारित जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात वेळापत्रक शासन निर्णय
जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात कालच्या शासन निर्णयानुसार दिनांक 21 ऑक्टोबर 2022 पासूनच ऑनलाईन अर्ज करण्यास वेळ देण्यात आला होता.
परंतु येऊ घातलेल्या दिवाळी सणाचा विचार करता शिक्षक व कार्यालयीन कर्मचारी हे दिवाळी सण साजरा करतील. कार्यालयीन कामकाज यामुळे वेळेवर पूर्ण होऊ शकणार नाही हा विचार करता सदर वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे.
कार्यालयीन स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षणाधिकारी प्राथमिक व संबंधित गटशिक्षणाधिकारी यांचे स्तरावरील याद्या प्रसिद्ध करण्याचे काम आता दिनांक 31 ऑक्टोबर 2022 ते 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत पूर्ण करायचे आहे.
व हे सर्व काम पूर्ण झाल्यानंतर संवर्ग एक व दोन मधील शिक्षकांनी दिनांक 5 नोव्हेंबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहे
💢सुधारित शिक्षक बदली वेळापत्रक येथे डाउनलोड करा
💢शिक्षण सेवक ग्रामसेवक यांचे मानधन वाढयेथे वाचा
0 Comments