Subscribe Us

खुशखबर..वित्त विभागाकडुन 4 टक्के डी.ए वाढ बाबतचा प्रस्ताव तयार हिवाळी अधिवेशनात होणार मंजूर



खुशखबर..वित्त विभागाकडुन 4 टक्के डी.ए वाढ बाबतचा प्रस्ताव तयार हिवाळी अधिवेशनात होणार मंजूर.

राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर , महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करणेबाबत आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे . ती म्हणजे राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा व इतर पात्र कर्मचारी त्याचबरोबर निवृत्तीवेतनधारक कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार डी.ए मध्ये 4 टक्के वाढ अनुज्ञेय करण्यात येणार आहे .डी.ए वाढ संदर्भातील आत्ताची महत्वपुर्ण अपडेट पुढीलप्रमाणे पाहुयात .

वित्त विभागाकडुन 4 टक्के डी.ए वाढ बाबतचा प्रस्ताव तयार 

               महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन 4 टक्के महागाई भत्ता वाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याची बातमी समोर आलेली आहे . सदरच्या प्रस्तावावर राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये निर्णय घेण्यात येणार आहे .वित्त विभागाच्या डी.ए वाढीच्या प्रस्तावानुसार , राज्यातील सातवा वेतन आयोगानुसार वेतन घेणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना माहे जुलै 2022 पासुन 4 टक्के महागाई भत्ता अनुज्ञेय करण्यात येणार आहे. यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचा एकुण महागाई भत्ता (Dearness allowance ) हा 38 टक्के होणार आहे 

          वरील प्रमाणे सदरचा वाढीव 4 टक्के महागाई भत्ता हा केंद्र सरकारप्रमाणे माहे जुलै 2022 पासूनच लागु करण्यात येणार असून माहे जुलै पासूनची डी.ए थकबाकीची रक्कम वेतन / पेन्शन देयकासोबत रोखीने अदा करण्यात येणार आहे .याबाबतचा निर्णय हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात येणार असल्याने , हा वाढीव महागाई भत्ता माहे डिसेंबर 2022 पासून प्रत्यक्ष रोखीने अदा होण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असणारी प्रतिक्षा अखेर संपणार आहे .

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments