Subscribe Us

बदली सुधारित वेळापत्रक 18 नोव्हेंबर 22 चे शासन परिपत्रक

 


बदली सुधारित वेळापत्रक 18 नोव्हेंबर 22 चे शासन परिपत्रक 


🍁 *Phase-3 जिल्हांतर्गत बदली* 🍁


*मा.अवर सचिव,ग्रामविकास यांच्या दि.18.11.2022 च्या सुधारित वेळापत्रकानुसार Phase-3 जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया ही एकूण 28 टप्प्यांमध्ये राबविली जाणार आहे.*


*◆सध्या सुरू असलेले टप्पे-*

📌 *टप्पा क्र.1-रिक्त पदांची यादी अद्ययावत करणे-*

*●जबाबदार यंत्रणा-मुख्य कार्यकारी अधिकारी.*

*●कालावधी-दि.18.11.2022 ते 18.11.2022.*

📌 *टप्पा क्र.2-विशेष संवर्ग भाग-1 व विशेष संवर्ग भाग-2 चे फॉर्म भरणे.*

*●जबाबदार यंत्रणा-शिक्षक.*

*●कालावधी-दि.18.11.2022 ते 21.11.2022*

*या टप्प्यात विशेष संवर्ग 1 व 2 च्या शिक्षकांनी आपापली सेवाविषयक माहिती व बदली पाहिजे किंवा नको एव्हढीच माहिती म्हणजेच बदलीसाठी होकार किंवा नकार भरायचा आहे.प्रशासनाकडून अर्जाची पडताळणी झाल्यानंतर व आपला अर्ज पात्र ठरल्यानंतर 30 शाळांचे प्राधान्यक्रम विशेष संवर्ग 1 साठी सुधारित वेळापत्रकाच्या 10 व्या टप्प्यात आणि विशेष संवर्ग 2 साठी 13 व्या टप्प्यात भरावयाचे आहेत.*


❓ *फॉर्म कोणी भरावे..?*

■■ *विशेष संवर्ग भाग-1* ■■

*●जिल्हा परिषदेने जाहीर केलेल्या बदलीपात्र शिक्षकांच्या यादीतील विशेष संवर्ग-1 च्या ज्या शिक्षकांना बदली हवी आहे, त्यांनी बदलीसाठी होकाराचा फॉर्म भरावा.ज्यांना बदली नको आहे, त्यांनी बदलीतून सूट मिळण्यासाठी नकाराचा फॉर्म भरावा.*

*●जे शिक्षक वरील बदलीपात्र यादीत नाहीत,परंतु दिनांक 07.04.2021 च्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 1.8.1 ते 1.8.20 नुसार विशेष संवर्ग 1 साठी पात्र आहेत,त्यांना बदली हवी असेल तर त्यांनी होकाराचा फॉर्म भरावा.*


*●संवर्ग 1 साठी सेवेची अट नाही,मात्र एकदा संवर्ग 1 मधून बदली झाल्यानंतर त्यांना पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही.(G.R. मुद्दा क्र.4.2.7)*

📢 *विशेष संवर्ग भाग-1 साठी महत्वाच्या बाबी-*

*1.विशेष संवर्ग 1 शिक्षकांना बदलीसाठी दोनच मार्ग उपलब्ध असतील.*

*●एक-बदलीतून सूट मागणे (नकार देणे)*

*●दोन-बदलीपात्र शिक्षकांना खो देणे.*

*●संवर्ग 1 मधील शिक्षकांना निव्वळ रिक्त पदांवर (Clear Vacancy) बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.2.6) ही तरतूद बदली अभ्यास गटाने विशिष्ट हेतू समोर ठेवून केली आहे.*

*●विशेष संवर्ग 1 मधील शिक्षकांनी मिळालेल्या अधिकाराचा वापर करताना योग्य ती काळजी घ्यावी. बदलीतून सूट घेणे म्हणजेच बदलीसाठी नकार देणे हा सुद्धा विशेष संवर्ग 1 अंतर्गत घेतलेला "लाभच" आहे याची जाणीव ठेवावी.*

*●बदलीसाठी नकार देणारा बदलीपात्र विशेष संवर्ग 1 मधील शिक्षक हा जोपर्यंत त्याची बदली होणार नाही, तोपर्यंत दरवर्षी बदलीपात्रच राहणार आहे. अशा शिक्षकांना दरवर्षी बदली प्रक्रियेत भाग घ्यावा लागणार आहे.*

*2.विशेष संवर्ग भाग 1 मधून फॉर्म भरणाऱ्या 1.8.1 ते 1.8.20 मधील शिक्षकांना आपापल्या संवर्गानुसार सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे अनिवार्य आहे. सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल. (G.R. मुद्दा क्.4.2.8)*


*●पडताळणीमध्ये अर्ज अपात्र ठरला तर संबंधित शिक्षकांचा अर्ज CEO लॉगिन वरून रद्द केला जाईल व चुकीची माहिती भरल्याबद्दल एक वेतनवाढ कायमस्वरूपी बंद करण्यात येईल. (शासन निर्णय दि. 28.06.2018 व उपसचिव ग्रामविकास यांचे पत्र दि.11.08.2022)*


*3.विशेष संवर्ग 1 मधून बदली झालेल्या शिक्षकांबद्दल बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास,त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून करण्यात येईल. अशी पडताळणी केल्यानंतर शिक्षकाने जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे, अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाचे निलंबन करून त्याच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी प्रस्तावित करतील. (G.R. मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5)*

💢बदली बाबत व्हिडिओ येथे डाउनलोड करा

*4.दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या लाभांचा इतरांनी जाणीवपूर्वक फायदा घेतल्यास, त्यांच्यावर RPWD Act 1995 व RPWD Act 2016 मधील तरतुदींनुसार कारवाई होऊ शकते.*

■■ *विशेष संवर्ग भाग-2* ■■

*●पती-पत्नी यांच्या सध्याच्या कार्यरत कार्यालयांमध्ये 30 कि.मी. पेक्षा जास्त अंतर असेल तर दोघांपैकी ज्यांना बदली हवी आहे, ते विशेष संवर्ग 2 मध्ये फॉर्म भरू शकतात.शासन निर्णयातील मुद्दा क्र.1.9.1 ते 1.9.6 नुसार प्राधान्यक्रमाने संवर्ग 2 मधील शिक्षकांच्या बदल्या होतील.*

*●संवर्ग 2 साठी सेवेची कोणतीही अट नाही,मात्र एकदा विशेष संवर्ग 2 मधून बदली झाल्यानंतर पुन्हा 3 वर्षे विनंती बदली मागता येणार नाही. (G.R. मुद्दा क्र.4.3.6)*

📢 *विशेष संवर्ग भाग-2 साठी महत्त्वाच्या बाबी-*

*1.विशेष संवर्ग 2 मधील शिक्षकांना जोडीदाराच्या कार्यालयाच्या 30 कि.मी. परिघातील सर्व उपलब्ध जागांपैकी 30 पर्याय निवडला येतील.*

*2.30 कि.मी. रस्त्यांचे अंतर हे सर्वात जवळच्या मार्गाने ग्राह्य धरण्यात येईल.30 कि.मी.अंतराचा दाखला हा "कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग/ कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग" या सक्षम अधिकाऱ्यांचाच ग्राह्य धरला जाईल.(G.R.मुद्दा क्र.4.3.5)*

     *इतर कोणताही अंतराचा दाखला ग्राह्य धरला जाणार नाही.*

*3.अर्ज पडताळणीमध्ये चुकीची माहिती भरल्याचे आढळल्यास त्यांचा अर्ज CEO लॉगिनवरून रद्द करण्यात येईल आणि त्यांच्यावर शासन निर्णय दि .28.06.2018 व उपसचिव, ग्रामविकास यांच्या दि.11.08.2022 च्या पत्रानुसार कारवाई होईल.*

*4.बदलीनंतर तक्रार प्राप्त झाल्यास व खोटी माहिती भरून बदली झाल्याचे आढळल्यास G.R.मुद्दा क्र.5.10.4 व 5.10.5 मधील तरतुदींनुसार निलंबनाची कारवाई होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करतील.*

💢बदली अपडेट वेळापत्रक येथे डाउनलोड करा

💢NMNS परिक्षा सराव पेपर येथे सविस्तर वाचा

💢महागाई भत्ता 38% अपडेट येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments