जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली बाबत विकल्प निवडण्यासाठी 12/11/22 चे शासन परिपत्रक
बदलीपात्र शिक्षक संवर्ग 4 बदली नको (अ) व बदली हवी (आ) चे स्पष्टीकरण पत्र दिनांक 12 ऑक्टोबर 2022
दि.०७.०४.२०२१ च्या शासन निर्णयान्वये बदली प्रक्रिया होणार आहे . शासन निर्णयात नमूद केल्यानुसार बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांना “ विवरण पत्र १ बदलीस पात्र शिक्षक' मध्ये (पृष्ठ क्र. १७ वर नमूद केल्याप्रमाणे अ) (मला बदली नको असून प्रशासकीय बाबीमुळे माझी बदली होत असल्यास, बदलीने नियुक्तीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) किंवा आ) (मला बदली हवी असून विनंतीने बदलीसाठी माझा खालील प्राधान्यक्रम विचारात घ्यावा) या पर्यायापैकी एक पर्याय निवडण्याची मुभा असून अशा शिक्षकांनी कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक प्रशासकीय बदलीसाठी पात्र राहतील", अशी तरतूद आहे.
दि. ०७/१०/२०२२ रोजी जिल्हा परिषद शिक्षक बदली अभ्यास गटासमवेत व्हीसीद्वारे बैठक आयोजित केली होती. सदर बैठकीतील चर्चेच्या अनुषंगाने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीबाबतच्या संदर्भीय क्र.१) येथील दि. ०७/०४/२०२१ च्या शासन निर्णयाचे "विवरण पत्र- १ बदलीस पात्र शिक्षक" बाबत खालीलप्रमाणे अधिकचे स्पष्टीकरण देण्यात येत आहे :-
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत पत्र येथे सविस्तर वाचा
जर एखाद्या शिक्षकांने सदर विवरण पत्र - १ मध्ये नमूद केलेला उक्त अ) येथील पर्याय निवडल्यास, अशा शिक्षकांच्या प्रशासकीय बाबीमुळे होत असलेल्या बदलीवेळी उपलब्ध असलेल्या रिक्त जागी, अशा शिक्षकांची बदली होईल. सदर बदली पूर्णत: प्रशासकीय असल्याने अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळेलच असे नाही. मात्र, जर एखाद्या शिक्षकाने सदर विवरण पत्र १ मध्ये नमूद केलेला उक्त आ) येथील पर्याय निवडल्यास अशा शिक्षकांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार व सेवाजेष्ठतेने बदली मिळू शकेल.
जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली बाबत सदर बाब जिल्हांतर्गत बदलीचे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी संबंधित गट शिक्षण अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणावी व त्याबाबतची पोच संग्रही ठेवावी. असे पत्र उपसचिव ग्राम विकास विभाग यांनी काढले आहे
💢बदली बाबत 12 नोव्हेंबर 22 शासन परिपत्रक येथे सविस्तर वाचा
0 Comments