Subscribe Us

बाल आनंद मेळावा आयोजन करून बालकदिन साजरा..

 


बाल आनंद मेळावा आयोजन करून बालकदिन साजरा..

जि प शाळा बोराखेडी येथे बालकदिनापासुन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जाणार...

      आज जि शाळा बोराखेडी येथे 14 नोव्हेंबर 22 रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती निमित्त पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून बालकदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे आज बालकदिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना वेगळा अनुभव मिळावा यासाठी बाल आनंद मेळाव्याचे नियोजन करण्यात आले. या बाल आनंद मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ तयार करून स्टाँल मांडले होते व इतर विद्यार्थ्यांनी त्या स्टाँलवर असलेले पदार्थ विकत घेऊन मनसोक्त आनंद लुटला. स्टाँलवरील पदार्थ विकत घेतांना नाविन्यपूर्ण आगळावेगळा अनुभव घेतांना विद्यार्थ्यांना वेगवेगळी अनुभूती अनुभवायला आली. पाणीपुरी, भेळ, भजी , शिरा, ठेचा भाकर, पोहे, उसळ,चाँकलेट असे वेगवेगळे पदार्थ विद्यार्थ्यांनी स्वतः बनवले होते. आपण केलेले पदार्थ विकताना त्यांना वेगळा आनंद मिळत होता. या मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना देवाणघेवाण व्यवहार व स्वतः केलेल्या कामाचा आनंद प्रत्यक्ष व सहज घेता आला. काही अनुभव हे पुस्तकांपेक्षा प्रात्यक्षिकातून उत्कृष्ट रितीने दिल्या जाते त्यातील हा आनंद मेळावा हे उत्कृष्ट उदाहरण होय.

           तसेच आज 14 नोव्हेंबर बालकदिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सर्व विद्यार्थ्यांना खिचडी सोबत जिलबी गोड पदार्थ देऊन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित करण्यात आला. आणि आज मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी बालकदिनापासुन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ होण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमास सुरवात होत आहे यामध्ये रोज एक तास ग्रंथालयातील पुस्तक वाचन, परिपाठात रोज सानेगुरुजी यांची एक कथा वाचन, तसेच वेगळा परिपाठ यात एक दिवस 50 सामान्य ज्ञानात राजकीय, भौगोलिक, ऐतिहासिक वैज्ञानिक प्रश्न, एक दिवस पाढे, एक दिवस इंग्रजी शब्द, इंग्रजी वाक्य , मराठी म्हणी, दर गुरुवारी बालसभा या सर्व उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमधे वाचन लेखन श्रवण वक्तृत्व समाधिटपणा ही कौशल्ये रूजविणे हाच एक शु़ध्द हेतू साधण्याचा प्रयत्न मुख्याध्यापक अनिल चव्हाण यांनी केला आहे. चित्र रंगवणे वक्तृत्व स्पर्धा छोटे छोटे खेळ या माध्यमातून आज विद्यार्थानी दिवसभर मनसोक्त आनंद लुटला तसेच या कार्यक्रमात शाळा समिती अध्यक्ष अनिल फुंड गजानन धोरण आकाश हटकर राहुल इंगळे शाळेतील शिक्षक सौ अनुप्रिता व्याळेकर सौ सुनिता हुडेकर सौ वामिंद्रा गजभिये सौ सिमा गोरे सुनिता न्हावकर संध्या नाईक जया चव्हाण सुनंदा इंगळे शितल तायडे दिपाली गोलाईत गब्बरसिंग पावरा हे उपस्थित होते

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments