खुशखबर....शासकीय महिला कर्मचारी यांच्या आई वडील किंवा सासू सासरे यांच्या ( medical bill ) वैद्यकीय खर्चाची प्रतिपुर्ति करणेबाबत शासन निर्णय
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिनांक 14 डिसेंबर 2022 रोजी वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती करता विवाहित महिला शासकीय कर्मचाऱ्याला तिच्यावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या तिच्याबरोबर राहत असलेल्या तिच्या आई-वडिलांची किंवा तिच्या सासू सासऱ्यांची निवड करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शासकीय कार्यालयात विवाहित महिला कर्मचारी यांनी जर तिचे आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाच्या वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती लाभ घेण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय प्रतिपूर्ती करिता निवड केली असेल, व असे अर्जा द्वारे त्या कार्यरत असलेल्या कार्यलयास लेखी कळविले असेल तर या अर्जावर नियमानुसार कार्यवाही होण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे.
शासनाच्या प्रत्येक कार्यातील महिला शासकीय कर्मचाऱ्यास तिने आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एकाची निवड वैद्यकीय खर्च प्रतिपूर्ती लाभ घेण्यासाठी ती करीत आहे. असे ज्या दिनांकास कळविले आहे त्या दिनांक पासून केवळ पुढील कालावधीसाठी संबंधित आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एक यांना घेतलेल्या वैद्यकीय उपचाराच्या खर्चाची प्रतिकृती शासनाकडून करण्यात येईल. म्हणजेच ज्या कालावधीत उपचार खर्चाच्या प्रतिकृतीची मागणी विहित शासकीय महिला कर्मचारी करीत आहे त्या कालावधीत संबंधितांच्या सेवा पुस्तकात सदर व्यक्तीची आई-वडील किंवा सासू-सासरे या दोघांपैकी एक यांची नोंद असणे आवश्यक आहे.
💢वरिल शासन निर्णय येथे डाउनलोड करा
💢शासकीय कर्मचारी यांच्या वेतनात समान टप्प्यावर समायोजन करणे बाबत शासन परिपत्रक येथे सविस्तर वाचा
0 Comments